Maharashtra MLA Disqualification Result LIVE : माझ्यावर बालीश आरोप करू नका, निकाल दिल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra news and updates in Marathi on MLA Disqualification Case Result (10 January 2024): राज्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
Shivsena mla Disqualification case
Shivsena mla Disqualification caseSaam TV
Published On

माझ्यावर बालीश आरोप करू नका, निकाल दिल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया

"मी कायद्याच्या तरतुदीचं पालन केलं आहे. संविधानाचं पालन केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने हा निर्णय दिला आहे. माझ्यावरील आरोप बालीश आहेत. खरंतर असे आरोप करणे हे संविधानाचा अवमान करण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय; आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर CM शिंदेंची प्रतिक्रिया 

'आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा आनंद दिघे यांच्या विचाराचा विजय आहे. हा निकाल एकाधिकारशाही, हुकूमशाहीचा पराभव आहे. या निकालानंतर त्यांना चांगला धडा मिळाला आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'मी पुन्हा सांगतो...', आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राहुल नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंना दिलासा, ठाकरे गटाचे आमदारही पात्र

ठाकरे गटाचे आमदारही पात्र, असा निर्णय देत राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना दिलासा आहेय.

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच : राहुल नार्वेकर

२१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते, असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.

2018 चं पक्ष नेतृत्व घटनेनुसार नाही : राहुल नार्वेकर

2018 चं पक्ष नेतृत्व घटनेनुसार नाही, असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे.

२३ जानेवारी २०१८ रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती- नार्वेकर

२३ जानेवारी २०१८ रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती- नार्वेकर

आमदार अपात्रता निकाल वाचनास सुरुवात 

२०१८ साली शिवसेना पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत

त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे

प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल

घटनेतील २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही

आमदार अपात्रतेचा निकाल थोड्याच वेळात, राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल

आमदार अपात्रतेचा निकाल थोड्याच वेळात, राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल

शिंदे गटाकडून सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा

दोन्ही गटाचे आमदार सभागृहात दाखल

शिंदे गटाकडून सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा

दोन्ही गटाचे वकील विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये दाखल

विधानभवनाचे सचिव आणि अधिकारीदेखील उपस्थित

निकाल काही असुद्या, पुढचं पाऊल जोरदार असेल : तेजस ठाकरे

आमदार अपात्रता निकालावरून प्रतिक्रिया येत असताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी देखील निकालावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. निकाल काहीही असुद्या आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल, असं तेजस ठाकरे म्हणाले.

Shivsena mla Disqualification case
MLA Disqualification Prediction: शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय? भाजपचा प्लान बी आणि कोण होणार पुढील मुख्यमंत्री? वाचा...

कदाचित निकाल हा ठाकरेंच्या विरुद्ध असेल; आमदार अपात्रता निकालावर काँग्रेसच्या नेत्याचं भाष्य

आमदार अपात्रता निकालाला काही तास उरलेले असतानाच, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित निकाल हा ठाकरेंच्या विरुद्ध असेल. त्यांना सुप्रीम कोर्टात जावे लागेल. निकाल वर्षावरील भेटीच्या आधीच ठरला आहे. ह्यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचायची आहे. त्यासाठी एवढा विलंब केला, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

MLA Disqualification Result : आमदार अपात्रता निकालाचे वाचन साडेचार वाजता सुरू होणार

आमदार अपात्रता निकाल वाचनाला साडेचार वाजता होणार सुरुवात

विधानसभा अध्यक्ष एक ते दीड तास निकालाचे वाचन करणार

निकालातील ठळक मुद्दे आधी वाचले जातील

PM Modi to Visit Nashik : पंतप्रधान मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेणार दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात जाऊन घेणार रामरायाचं दर्शन

१२ जानेवारीला नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दर्शन आणि आरती करणार

रामायणाचा एक पाठ देखील मोदी मंदिरात म्हणणार

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याआधी मोदी श्री काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार

त्यानंतर नाशिकच्या रामकुंडावर देखील मोदींच्या हस्ते होणार जलपूजन

२२ जानेवारीला उद्धव ठाकरे देखील श्री काळारामाचं दर्शन आणि आरती करण्यासाठी येणार

MLA disqualification : आमदार अपात्रता निकाल लाईव्ह बघता येणार

शिवसेना आमदार अपात्रता निकाल आता लाइव्ह बघता येणार आहे. तत्पूर्वी विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांची बैठक सुरू आहे.

विधिमंडळातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकीला सुरुवात झाली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल संध्याकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. त्याआधी नियोजन कसे आहे, याचा आढावा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर घेत आहेत.

सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश

मुंबईतल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं

दुपारी 3 वाजता शिंदे गटाच्या आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश

बाळासाहेब भवनात एकत्र येऊन आमदार विधानभवनात जाणार

Mumbai Goa Highway: भररस्त्यात धावत्या ST बसचा एक्सल तुटला; मुंबई-गोवा महामार्गावरील मोठी दुर्घटना सुदैवाने टळली

भररस्त्यात धावत्या ST बसचा एक्सल तुटल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर माणगावनजीक घडली आहे. प्रसंगावधान राखत चलकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सदर ST बस ठाण्याहून महाबळेश्वरला जात असताना धावत्या ST बसचा एक्सल भर रस्त्यात निखळून पडला.

विधानसभा अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक आहेत, ते योग्य तोच निर्णय घेणार - नरहरी झिरवळ

नरहरी झिरवळ

आजच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य नाही

आताचे अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक आहेत, ते योग्य तोच निर्णय घेणार

जो निर्णय होईल त्याला माझ्या शुभेच्छा आहेत

पुणे - मुंबई डेक्कन क्वीनच्या डब्याच्या खालच्या भागातून धूर निघाल्याची घटना

पुणे - मुंबई डेक्कन क्वीनच्या डब्याच्या खालच्या भागातून धूर निघाल्याची घटना

कर्जतच्याजवळ अचानक धावत्या रेल्वेतून धूर निघाल्याने रेल्वे 10 मिनिटे थांबवली होती

कोणतीही दुर्घटना झाली नसून रेल्वे पुढे मार्गस्थ

सकाळी ८ वाजून 55 मिनिटांदरम्यान घडली घटना

पण सातत्याने अशा घटना घडत असल्याचं प्रवाशांचे म्हणणे

रेल्वे प्रशासनाने देखभालीकडे लक्ष देण्याची केली मागणी

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची ACB चौकशी

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची ACB चौकशी

अलिबाग येथील ACB कार्यालयात आज होणार चौकशी

वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांची वहिनी चौकशीला राहणार गैरहजर

भाऊ आणि पुतण्या दोघेही चौकशीला सामोरे जाणार

चौकशीवेळी राजन साळवी स्वतः कुटुंबियांसोबत हजर राहणार

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घेतली भेट

जगविख्यात क्रिकेटचे कोच रमाकांत आचरेकर यांच्या शिवाजी पार्क परिसरात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासंदर्भात घेतली भेट

Pune News: पुण्यातून सुटणाऱ्या १६ एक्स्प्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रद्द

पुण्यातून सुटणाऱ्या १६ एक्स्प्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रद्द

उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता

आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथे यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत

पुणे जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, पुणे हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, वास्को द गामा निजामुद्दीन एक्स्प्रेस, यशवंतपूर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या गाड्यांच्या फेऱ्या र

शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांना ईडीचं समन्स

शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांना ईडीचं समन्स

17 तारखेला हजर राहण्याचे आदेश

जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी बजावलं समन्स

मंगळवारी वायकरांच्या घरी तसेच त्यांचे पार्टनर यांच्या घरावर आणि कार्यालयांवर टाकल्या होत्या ईडीने धाडी

एकूण सात ठिकाणी राबवण्यात आल होते धाडसत्र

जोगेश्वरी येथील वेरावली गावातील भूखंडाचा गैरवापर करणे आणि त्रिपक्षीय कराराची तथ्य लपवून भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची पालिकेकडून परवानगी मिळवल्या प्रकरणी वायकरांवर आहे गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com