राज्यातील हायहोल्टेज मतदारसंघ असलेल्या नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या मतदारसंघामध्ये महायुतीमधील भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी निवडणूक लढवली. या दोघांपैकी कोण विजयी होणार याबाबत सकाळच्या एक्झिट पोलमध्ये काय सांगितले आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
सकाळच्या एक्झिट पोलनुसार, नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा देखील भाजपचेच पारडं जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्यांदा निवडणूक लढवली असून यावेळी देखील तेच विजयी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस हेच संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे ५ वेळा विजयी झाले आहेत. ते सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांनी केलेली कामं पाहता त्यांचा या मतदारसंघावर मोठा पगडा पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल गुडधे यांनी या मतदारसंघात जोरदार आणि घरोघरी जाऊन प्रचार केला. पण भाजपने देखील प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच सर्वात जास्त पसंती मिळत असल्यामुळे तेच या मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी होतील असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.