उल्हासनगर : उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सार्वजनिक माहिला (Ulhasnagar) शौचालयात एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)
उल्हासनगर शहरातील कैंप नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीनगर येथील सार्वजनिक शौचालयात आज सकाळच्या सुमारास एक महिला शौचालयास गेली होती. तेव्हा तिला शौचालयात एक बाळ असल्याचे दिसले. महिला घाबरून शौचालयाच्या बाहेर आली आणि परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाळाला शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांकडून शोध सुरु
सदर घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस (Police) ठाण्याला देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. यानंतर आजूबाजूच्या परिसरात चौकशी करत नवजात बाळाच्या आईचा शोध सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.