Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : शरद पवार गटाला साताऱ्यामध्ये मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. साताऱ्यातील बड्या नेत्याने कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • शरद पवार गटाचे नेते अनिल देसाई यांनी कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश केला

  • या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • दहिवडी येथे जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देसाई यांचा पक्षप्रवेश पार पडला.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे संकेत पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी महानगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज संस्थांची प्रभागरचना जाहीर झाली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नेते अनिल देसाई यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (२४ ऑगस्ट) सातारा येथील दहिवडी येथे अनिल देसाई यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश झाला आहे. जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये देसाई यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला अजित पवारांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. अनिल देसाई हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.

साताऱ्यामध्ये महायुतीत खडाजंगी

साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्धामुळे महायुतीमध्ये दरार पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत नाव न घेता डिवचणारी टीका केली, त्यानंतर पाटील यांनीही प्रत्युत्तर देत गोरे यांना टोला लगावला. दोघांचे कार्यक्रम आणि टीका-प्रत्युत्तर यामुळे साताऱ्यात अजित पवार गट व भाजपमध्ये ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT