Maharashtra Politics
Maharashtra Politicsx

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा हादरा! बडा नेता शिंदेसेनेत जाणार, माजी आमदारांचाही होणार पक्षप्रवेश

Maharashtra Political News : ३७ वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेले माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
Published on
Summary
  • ३७ वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ राहणारे माजी महापौर त्र्यंबक तुपे ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

  • त्र्यंबक तुपे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

  • यासोबत दोन माजी आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार असून, ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे, नवी मुंबई अशा काही ठिकाणी महानगरपालिका, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. येत्या काही दिवसात निवडणुकीसंबंधित मोठी घोषणा होईल असे म्हटले जात आहे. यामुळे सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. ३७ वर्ष शिवसेनेत एकनिष्ठ असलेल्या सहसंपर्कप्रमुख आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्का बसला आहे.

Maharashtra Politics
Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटातून बाहेर पडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे तुपे यांनी राजीनामा पाठवला आहे. 'पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत माझी कुठलीच नाराजी नाही. पण मला वॉर्डाच्या विकासाचा विचार करणे गरजेचे आहे', असे त्र्यंबक तुपे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics
Actor Death : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा, निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल

३७ वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ राहणारे माजी महापौर त्र्यंबक तुपे शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. यासोबत दोन माजी आमदारांचा देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra Politics
Police Death : ड्युटीवर असताना छातीत दुखू लागलं, पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com