Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने वाहनचालकांना दिलासा दिला आहे.
१५ वर्षांऐवजी २० वर्षे जुनी वाहने चालवण्यास परवानगी दिली आहे.
यासाठी वाहनधारकांना नोंदणी नूतनीकरणाचे वेगवेगळे शुल्क भरावे लागणार आहे.
हा नियम दिल्ली-एनसीआर वगळता संपूर्ण देशभर लागू होणार आहे.
Automotive : आता तुम्हाला तुमची २० वर्ष जुनी गाडी चालवता येणार आहे. केंद्र सरकारने कार आणि मोटारसायकल चालकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील नियमांमध्ये बदल करुन जुन्या वाहनांचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या वाहनांचे वय १५ वर्षांऐवजी २० वर्षे करण्यात आले आहे. पण यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र हा नियम दिल्ली-एनसीआरमधील लोकांना लागू होणार नाही.
केंद्र सरकारने जुन्या वाहनांच्या मालकांना दिलासा दिला आहे. आता १५ वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी २० वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे. त्यासाठी अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे. याचा अर्थ, जुने वाहन आता आणखी ५ वर्षे चालवता येणार आहे. केंद्र सरकारचा हा आदेश दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त संपूर्ण देशभरात लागू केला जाईल.
केंद्रीय मोटार वाहन नियम, २०२५ अंतर्गत नियमामध्ये सरकारने बदल केला आहे. रस्त्यांवरुन जुनी, प्रदूषणकारी वाहने हळूहळू कमी करणे आणि लोकांना नवीन वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे हे या नियमामागील उद्दिष्ट आहे. अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून हे नियम प्रभावी मानले जातील.
यातील नव्या तरतुदींनुसार, अवैध वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. दुचाकींसाठी हे शुल्क २,००० रुपये, तीनचाकींसाठी ५,००० रुपये आणि हलक्या मोटार वाहनांसाठी (एलएमव्ही) नोंदणी नूतनीकरण शुल्क १०,००० रुपये असेल. याशिवाय आयात केलेल्या दुचाकींसाठी २०,००० रुपेय आणि आयात केलेल्या चारचाकी वाहनांसाठी ८०,००० रुपये आकारले जातील. इतर श्रेणीतील वाहनांसाठी हे शुल्क १२,००० असेल.
वेगवेगळ्या वाहनांसाठी नवीन शुल्क -
अवैध वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण शुल्क ₹ १०० असेल.
मोटारसायकल मालकांना आता ₹ २,००० भरावे लागतील.
तीनचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी ₹ ५,००० शुल्क आकारले जाईल.
हलक्या मोटार वाहनांसाठी (LMV) ₹ १०,००० भरावे लागतील.
आयात केलेल्या दुचाकींसाठी शुल्क ₹ २०,००० निश्चित करण्यात आले आहे.
आयात केलेल्या चारचाकींसाठी शुल्क ₹ ८०,००० निश्चित करण्यात आले आहे.
इतर श्रेणीतील वाहनांसाठी ₹ १२,००० शुल्क आकारले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.