Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Pune Assembly Election 2024: २१ पैकी १९ मतदारसंघात बंडखोरी, पुण्यात राजकीय पक्षांचे टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळामुळे पुण्यामध्ये बंडखओरीला उधाण आले. बारामती, वडगाव शेरी मतदारसंघ सोडता उर्वरित सर्व मतदारसंघात बंडखोरी झाली.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाराजी नाट्य सुरूच आहे. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमधील नेते मंडळी आणि पदाधिकारी नाराज होते. त्यामुळे या पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पुण्यामध्ये तर मोठ्याप्रमणात बंडखोरी झाली. पुण्यातील २१ मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघामध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळामुळे पुण्यामध्ये बंडखओरीला उधाण आले. बारामती, वडगाव शेरी मतदारसंघ सोडता उर्वरित सर्व मतदारसंघात बंडखोरी झाली. पुणे शहर, पुणे जिल्ह्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील मतदारसंघामध्ये बंडखोरांना थंड करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांचे राजकीय कौशल्यपणाला लावावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. भाजप, शिवसेना शिंदे ग्रुप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमध्ये आणि काँग्रेस, शिवसेना ठाकरे ग्रुप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या महाविकास आघाडीमध्ये आजच्या दिवसांपर्यंत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु होती. या पक्षांनी जागा वाटप केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज झाले. तर काही ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली नाह. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार आणि महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली नाही. पुणे शहरात सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये बंडखोरी झाली आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अर्ज भरला आहे. शिवाजीनगर काँग्रेसचे मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे माजी महापौर आबा बागूल, काँग्रेस व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष भरत सुराणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे यांनी बंडखोरी केली आहे.

कोथरूड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी अर्ज भरला आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शरद ढमाले यांनी बंडखोरी केली. तसेच ढमाले यांनी भोरमधूनही अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे हरिश्चंद्र दांगट यांच्या पत्नी अनिता दांगट, नागेश शिंदे यांनी तर काँग्रेसचे मिलिंद पोकळे, राहुल मते यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे भरत वैरागे यांनी बंडखोरी केली. हडपसरमधून शिवसेना उबाठाचे समीर तुपे महाविकास आघाडीतून बंडखोरी केली आहे. तर वडगावशेरीतून बंडखोरी टाळण्यात यश आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वपक्षीयांची बंडखोरी झाली आहे. मावळ मतदारसंघात आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात सर्वपक्षींनी आघाडी उघडली आहे. येथे महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यासह अन्य पक्षांनी बापूसाहेब भेगडेंना पाठिंबा दिला आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेनेचे कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे भाजपचे किरण दगडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून महायुतीमध्ये बंडखोरी केली. जुन्नर विधानसभेतून भाजपच्या आशा बुचके यांनी, तर शिवसेना उबाठाचे माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शिरूर विधानसभेत भाजपचे प्रदीप कंद आणि संजय पाचंगे, राष्ट्रवादीचे शांताराम कटके यांनी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. दौंड विधानसभेतून अजित पवार यांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक, जिल्हा परिषदेची माजी सदस्य वीरधवल जगदाळे यांनी बंडखोरी केली. पुरंदर विधानसभेत महायुतीमध्ये भाजपतर्फे गंगाराम जगदाळे, जालिंदर कामठे, पंडित मोडक, राष्ट्रवादी पक्षातर्फे दिगंबर दुर्गाडे, दत्तात्रेय झुरंगे, गणेश जगताप यांनी अर्ज भरून बंडखोरी केली. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे अभिजित जगताप, शंकर हरपळे, संदीप मोडक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाजी झेंडे यांनीही अर्ज भरला.

खेड विधानसभेत महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल देशमुख, सुधीर मुंगसे आणि काँग्रेसचे अमोल दौंडकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. महायुतीमध्ये शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी स्वराज्य पक्षातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून प्रवीण माने यांनी बंडखोरी केली. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इंदापुरातून मनसेतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे. आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष अथर अब्बाल हुसेन इनामदार, अशोकराव काळे यांनी अपक्ष अर्ज भरला. शिवसेना उबाठातर्फे सुरेखा निघोट यांनीही अर्ज भरला आहे.

पिंपरी मतदारसंघात महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे मनोज कांबळे यांनी बंडखोरी केली. महायुतीमध्ये शिवसेनेचे जितेंद्र ननावरे, रिपाइं आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी केली. चिंचवड मतदारसंघात महायुतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाऊसाहेब भोईर, विठ्ठल ऊर्फ नाना काटे, संदीप चिंचवडे, भाजपचे चंद्रकांत नखाते यांनी अर्ज दाखल केला. तर महविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे मोरेश्‍वर भोंडवे यांनी बंडखोरी केली. भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठाचे रवी लांडगे यांनी अर्ज भरला आहे. शिरूर मतदारसंघातून एकच नाव असलेल्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अशोक रावसाहेब पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर अशोक गणपत पवार, अशोक रामचंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरचा दिवाळीनिमित्त खास फोटोशूट

IPL 2025: कोण रिटेन,कोण रिलीज? आज निकाल लागणार; IPL रिटेंशन कुठे पाहता येणार लाईव्ह?

Priya Bapat : "कजरा मोहब्बत वाला..." प्रिया बापटचा ९०च्या दशकातील गाण्यावर भन्नाट रील; सुमधुर आवाजाने केलं मंत्रमुग्ध

Diwali Pahat 2024 : दादर, ठाणे, डोंबिवलीमध्ये दिवाळी पहाटचा जल्लोष; पाहा VIDEO

Viral Video: झोपण्यासाठी उशी घेतली अन् निघाला भलामोठा कोब्रा; व्हायरल VIDEO पाहून उडेल थरकाप

SCROLL FOR NEXT