Maharashtra Politics : जनतेला कौल शिंदेंना की ठाकरेंना? राज्यातील 16 मतदारसंघ ठरवणार सत्तेचं गणित? वाचा

shivsena vs Shivsena : शिवसेना कोणाची हे आता जनतेच्या न्यायालयात ठरणार आहे. मुंबई, ठाण्यातील 16 मतदार संघामध्ये विजयासाठी दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आणि पक्षाचे नेते यांची प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. पाहूया एक रिपोर्ट...
Eknath shinde Vs uddhav thackeray
Eknath shinde Vs uddhav thackeray Saam TV
Published On

मुंबई : शिवसेना कुणाची हा प्रश्न सुप्रीम कोर्टात देखील अनुत्तरीत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यातील अंतिम निर्णय जनतेच्या न्यायालयात होणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि कल्याण या परंपरागत ठिकाणी ही लढाई अत्यंत कठीण होणार आहे, जिथे दोन्ही सेनेचे प्राबल्य आहे. पण दोन्ही शिवसेनेने कितीही ताकद लावली, प्रचार केला तरी 16 जागा निवडणुकीत बाजीगर कोण हे ठरणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला आहे तर मुंबई ठाकरे कुटुंबाचे घर आहे. वरळी ते कोपरी पाचपाखडी कडवी लढाई दोन्ही शिवसेनेमध्ये असणार आहे. पाहूया कोणते मतदारसंघ आहेत..

शिवसेना विरूद्ध शिवसेना

भायखळा

शिवसेना शिंदे गट यामिनी जाधव

ठाकरे गट मनोज जामसूतकर

------------

वरळी

शिवसेना शिंदे गट मिलिंद देवरा

ठाकरे गट आदित्य ठाकरे

------------

माहिम

शिवसेना शिंदे गट सदा सरवणकर

ठाकरे गट महेश सावंत

------------

जोगेश्वरी पूर्व

शिवसेना शिंदे गट मनिषा वायकर

ठाकरे गट अनंत नार

------------

मागाठाणे

शिवसेना शिंदे गट प्रकाश सुर्वे

ठाकरे गट उदेश पाटेकर

------------

कुर्ला

शिवसेना शिंदे गट मंगेश कुडाळकर

ठाकरे गट प्रविणा मोरजकर

Eknath shinde Vs uddhav thackeray
Baramati Assembly Constituency: पवार विरुद्ध पवार लढाई, अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीमध्ये तगडी फाइट

विक्रोळी

शिवसेना शिंदे गट सुवर्णा करंजे

ठाकरे गट सुनिल राऊत

------------

दिंडोशी

शिवसेना शिंदे गट संजय निरूपम

ठाकरे गट सुनिल प्रभू

------------

चेंबूर

शिवसेना शिंदे गट तुकाराम काते

ठाकरे गट फातर्पेकर

------------

अंधेरी पूर्व

शिवसेना शिंदे गट - मुरजी पटेल

ठाकरे गट रुतुजा लंके

------------

भांडूप

शिवसेना शिंदे गट अशोक पाटील

ठाकरे गट रमेश कोरगावकर

------------

कोपरी-पाचपाखाडी

शिवसेना शिंदे गट -एकनाथ शिंदे

ठाकरे गट - केदार दिघे

------------

ओवळा माजीवाडा

शिवसेना शिंदे गट - प्रताप सरनाईक

ठाकरे गट - नरेश मनेरा

------------

अंबरनाथ

शिवसेना शिंदे गट - बालाजी किणीकर

ठाकरे गट - राजेश वानखेडे

Eknath shinde Vs uddhav thackeray
Assembly Election: महायुतीत बंडाचा झेंडा, उल्हासनगरमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यानंच भाजप उमेदवाराविरोधात भरला अर्ज

------------

कल्याण पश्चिम

शिवसेना शिंदे गट - विश्वनाथ भोईर

ठाकरे गट - सचिन बासरे

------------

कल्याण ग्रामीण

शिवसेना शिंदे गट - शांताराम मोरे

ठाकरे गट - महादेव घाटाळ

------------

भिवंडी ग्रामीण

शिवसेना शिंदे गट - राजेश मोरे

ठाकरे गट - सुभाष भोईर

------------

या निवडणुकीत कोण बाजी मारणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. मुंबई आणि ठाणे येथील ही लढाई महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर निर्णायक ठरेल. कोणती सेना खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात आपली छाप सोडते, हे या विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com