Shrinivas Vanga First Statement Saam Tv
महाराष्ट्र

Shrinivas Vanga: पुढे जे होईल ते मी भोगेल..., ४ दिवसांनंतर घरी परतलेल्या श्रीनिवास वनगांची पहिली प्रतिक्रिया

Shrinivas Vanga First Statement: श्रीनिवास वनगा चार दिवसांनंतर घरी आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Priya More

पालघर विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा चौथ्या दिवशी घरी परतले. श्रीनिवास वनगा नैराश्येत गेले होते. ते घर सोडून निघून गेले होते. त्यांचे दोन्ही मोबाइल बंद होते. चार दिवसांनंतर ते घरी आपल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. यावेळी श्रीनिवास वनगा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी 'राजकारणामध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही. त्याची शिक्षा मी भोगत आहे.', असे मत व्यक्त केले.

श्रीनिवास वनगा यांनी सांगितले की, 'मला सांगितले होते की एकाही आमदाराला आम्ही डावलणार नाही. तिकीट देणार आणि १०० टक्के निवडून आणणार. पण माझ्यावर कुठेतरी जाणूनबुजून षडयंत्र रचले गेले आणि माझे तिकीट कापले गेले. माझ्या मतदारसंघात मी खूप प्रामाणिकपणे काम करत होतो. मी रागाच्या भरात गेलो होतो. पण खूप लांब गेलो नव्हतो तर नातेवाईकांकडे गेलो होतो. माझी फॅमिली खूपच डिस्टर्ब आणि नाराज होती. मुलगा आजारी होता. शेवटी किती दिवस हे नाटक करणार. त्यामुळे सुखरूप घरी येण्याचे मी ठरवले.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'पुढे जे होईल ते मी भोगेल. पण घरी सुखरूप आलेले बरे. मला फक्त ऐवढं आयुष्य नाही. मला या जगात खूप काही करण्यासारखे आहे. माझे वय काही गेले नाही. त्यामुळे राजकीय घडामोडी घडत असतात. आज पद असेल नसेल त्याची मला काळजी नाही. काम करत राहायचे. घरच्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मी भरपूर वेळ देऊ शकतो. मला कळाले की या जगात प्रामाणिकपणाचे काम नाही. राजकारणामध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही. त्याची शिक्षा मी भोगत आहे.

तसंच, 'शंभूराजेंशी मी बोललो. विधान परिषदेची उमेदवारी देतील याची मला आशा नाही. माझ्यासारखा आदिवासी आमदार. द्यायचे असेल तर मोठ्या मनाने द्यावे. मी कोणत्या पक्षात जाणार नाही. मी पक्षही सोडला नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी महायुतीमध्येच काम करेल. आमच्या रक्तातच आहे भाजपनंतर शिवसेना. आम्ही हिंदुत्वाला जागणारा आणि आरएसएसशी एकनिष्ठ आहे. मी पक्ष सोडून जाणार नाही हे खरं.', असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

वनगांनी आरोप केला की, 'माझा पत्ता कट करण्याचे काम प्लानिंगने केले. कार्यकर्त्यांना भडकावले. जिल्हाप्रमुखांच्या जवळचा उमेदवार पाहिजे होता. त्यांच्या अंडरखाली राहून काम करेल. मी तसा प्रामाणिक आहे. माझी मानसिकता नव्हती. मला साहेबांचा फोन आला होता. पण त्यांच्याशी बोललो नाही. मी शंभूराजेंशी बोललो आणि त्यांना सांगितले की मी प्रामाणिकपणे राहिल आणि काम करेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

SCROLL FOR NEXT