Maharashtra MLC Election Result 2024: महायुतीचा महाविकास आघाडीला दणका; कुणाची मतं फुटली? कुणाला किती मतं मिळाली? विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल वाचा सविस्तर

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ उमदेवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले असून शेकापचे जयंत पाटील याचा पराभव झाला आहे.
Vidhan Parishad Election Result: महायुतीचा महाविकास आघाडीला दणका; कुणाची मतं फुटली? कुणाला किती मतं मिळाली? विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल वाचा सविस्तर
Mahayuti and Mahavikas Agahadi MembersSaam Digital
Published On

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीला धक्का बसला असून शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्या मिलिंद नार्वेकर यांनी निडणुकीत ट्विस्ट निर्माण करून सर्व पक्षांना कामाला लावलं, त्यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. ठाकरे गटाचं हे मोठं यश मानलं जात आहे. मात्र कोणाची मतं कोणाकडे गेली? याचीच चर्चा निकालानंतर राज्यभर रंगली आहे.

पाहूयात कोणाला किती मतं मिळाली

भाजप

पंकजा मुंडे – २६

सदाभाऊ खोत – २६

योगेश टिळेकर – २६

अमित गोरखे – २६

परिणय फुके – २६

शिवसेना शिंदे गट

कृपाल तुमाने – २५

भावना गवळी – २४

अजित पवार गट (राष्ट्रवादी )

शिवाजीरावर गर्जे – २४

राजेश विटेकर – २३

महाविकास आघाडीचे उमेदवार

शिवसेना उद्धव ठाकरे गट

मिलिंद नार्वेकर – २४

काँग्रेस

प्रज्ञा सातव – २५

राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थन

जयंत पाटील(शेकाप) – १२

भाजपने विधान परिषदेत ५ उमेदवार दिले होते, त्यांच्याकडे विधानसभेत भाजपकडे १०३ आमदारांचं संख्याबळ आहे. त्यांच्या प्रत्येक मतदाराला २६ मतं मिळाली असून एकूण १३० मतं मिळाली आहेत. यात भाजपसोबत असलेल्या अपक्षांचा समावेश असला तरी काँग्रेसची ८ मंत फुटल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडे ३७ आमदार आहेत, त्यांनी दोन उमेदवार दिले होते. शिवाय १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले.

Vidhan Parishad Election Result: महायुतीचा महाविकास आघाडीला दणका; कुणाची मतं फुटली? कुणाला किती मतं मिळाली? विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल वाचा सविस्तर
Pankaja Munde Win : पंकजा मुंडे ५ वर्षांनी पुन्हा आमदार, बहीण प्रीतम मुंडे कॅमेऱ्यासमोर बोलता बोलता रडल्या!

महायुतीतील अजित पवार गटाकडे ४२ आमदारांचं संख्याबळ आहे. त्यांनी दोन मतं दिली होती. मात्र दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी ४६ मतांची आवश्यकता होती. पण त्यांना ४७ मतं मिळाली आणि दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे ज्यादाची ५ मतं कुणाची? हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

काँग्रेसकडे ३७ आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे काँग्रेसने फक्त प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती. प्रश्न उरतो तो त्यांच्या अतिरिक्त १४ मतांचा. ही मतं जयंत पाटील यांच्या पारड्यात पडतील अशी शक्यता होती. मात्र जयंत पाटील यांना केवळ पवार गटाची १२ मतं मिळाली. उद्धव ठाकरे गटाचे उमदेवार मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या पसंतीत २२ मतं मिळाली होती, ठाकरे गटाकडे केवळ १५ आमदार होते. त्यामुळे एका मतासाठी त्यांना प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीच्या तीन मतांवर अलंबून रहावं लागल्याचं बोललं जातं आहे.

Vidhan Parishad Election Result: महायुतीचा महाविकास आघाडीला दणका; कुणाची मतं फुटली? कुणाला किती मतं मिळाली? विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल वाचा सविस्तर
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पूर्ण, १२ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; कधी लागणार निकाल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com