Shrinivas Vanga: ४ दिवसांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले, पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज

Shrinivas Vanga Returned Home After 4 Days: आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले. त्यामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला.
Shrinivas Vanga: ४ दिवसांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले,  पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज
Shrinivas Vanga Returned Home After 4 DaysSaam Tv
Published On

रुपेश पाटील, पालघर

नॉट रिचेबल असलेले शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा तब्बल ४ दिवसानंतर घरी परतले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा ४ दिवसांपासून घर सोडून निघून गेले होते. त्याचे दोन्ही मोबाइल नॉट रिचेबल लागत होते. त्यामुळे कुटुंबीय आणि कार्यकर्ते चिंतेत आले होते. अखेर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले. त्यामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला.

पालघर विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा नैराश्येत आले होते. सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या मनातील खदखद प्रसार माध्यमांचा समोर व्यक्त केली. त्यानंतर वनगा आपले दोन्ही मोबाईल बंद करून घरात कोणालाही कल्पना न देता अज्ञातवासात निघून गेले. मात्र तब्बल ३६ तासानंतर बुधवारी पहाटे तीन वाजता श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटून आपण सुखरूप असल्याची माहिती देत पुन्हा मित्र परिवारासोबत नातेवाईकाकडे निघून गेले.

Shrinivas Vanga: ४ दिवसांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले,  पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज
Maharashtra Election: सेम नेम कुणाचा गेम? कोणाची मतं खाणार, कोणाला फायदा होणार?

आपल्याला तिकीट मिळालं नसल्याने माझं मानसिक संतुलन ठीक नाही मला आरामाची गरज आहे, असं सांगून ते पुन्हा आपले दोन्ही फोन बंद करून निघून गेले. मात्र बुधवारी साधारणतः दहा वाजता श्रीनिवास वनगा यांचे कुटुंब देखील घराला कुलूप लावून घर बंद करून निघून गेले. त्यामुळे ते नेमके कुठे गेले अशी चर्चा सुरू होती. अशामध्ये तब्बल चार दिवसानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजता श्रीनिवास वनगा आपल्या कवाडा येथील घरी परत आहे. श्रीनिवास वनगा घरी परत आल्यामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला.

Shrinivas Vanga: ४ दिवसांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले,  पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज
Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com