महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होत चालली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज भरून झाले आहेत. जागा वाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बंडखोरी केली. महायुतीतील अनेक जागांवर देखील नाराजीनाट्य पाहायला मिळाले आणि बंडखोरी करण्यात आली. आता या बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोरी केलेल्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार स्वतः संवाद साधणार आहेत. ज्याठिकणी बंडखोरीने महाविकास आघाडीला मदत होणार आहे त्या ठिकाणी सर्वात प्रथम बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होताना पाहायला मिळणार आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली. यामधील काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काहींनी इतर पक्षांमध्ये प्रवेश करत त्याद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता ऐन दिवाळीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी पुढे मोठे आव्हान राहणार आहे ते म्हणजे या बंडखोरांना रोखण्याचा. या बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. आपल्या पक्षाची ताकद कायम ठेवण्यासाठी आणि बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी हे प्रयत्न केले जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.