Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake: 'जरांगेंच्या बैठका सरकार पुरस्कृत, आमदाराने दिले १० ते १५ लाख'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil: बीडच्या मांजरसुंब येथे मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक सभा होणार आहे. या सभेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली. जरांगेंच्या बैठका सरकार पुरस्कृत', असा आरोप हाकेंनी केला आहे.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची आज बीड जिल्ह्यातील मांजरसुंब येथे अंतिम निर्णायक सभा होणार आहे. या सभेसाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने यायला सुरूवात झाली आहे. या सभेवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या या बैठकीसह इतर बैठका या सरकार पुरस्कृत आहेत. ही राज्यकर्ते पुरस्कृत झुंडशाही असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

मनोज जरांगेंना या बैठकांसाठी एका मतदारसंघातून आमदार १० ते १५ लाख रुपये देत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. यामुळेच मराठवाड्यातल्या छोट्या-छोट्या गावातही जरांगेंची मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागल्याचे ते म्हटलेय. ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप हाकेंनी केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाहीये. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडं घालणार असल्याचं हाकेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा बोचरी टीका केली. अमोल मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत. मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा असल्याचा प्रहार हाकेंनी केलाय. दरम्यान, 'बिग बॉसच्या घरात अमोल मिटकरी चार-पाच तासही टिकणार नाहीत. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांना काही काम उरणार नाहीय. त्यामुळे महाराष्ट्रातील काही तमाशा मंडळाना आपण त्यांच्यासाठी सोंगाड्या किंवा ढोलकीवाला म्हणून काम देण्यासाठी‌ विनंती करेल.', असा चिमटा देखील हाकेंनी मिटकरींना काढलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT