पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद होणार, पुण्यातील दाम्पत्यानं बनवलं 'पर्जन्यमापक यंत्र'

पुण्यातील सपकाळे दाम्पत्याने विकसित केलेले ‘टिपिंग बकेट पर्जन्यमापक’ यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद घेणाऱ्या या यंत्रामुळे पीकविमा दाव्यांसाठी अचूक डेटा मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
A Pune-based couple showcasing their innovative tipping bucket rain gauge designed to measure rainfall with high precision for farmers.
A Pune-based couple showcasing their innovative tipping bucket rain gauge designed to measure rainfall with high precision for farmers.saam tv
Published On

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं... अशावेळी पिकविम्यासाठी पाऊस किती पडला? हे जाणून घेणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असतं... त्यामुळे शेतकरी अनेकदा पर्जन्यमापनाच्या सरकारी आकडेवारीवर अवलंबून असतात....मात्र पुण्यातल्या सांगवीतील एका दाम्पत्यानं मेड इन इंडिया असं पर्जन्यमापक यंत्र तयार केलयं...हवामानशास्त्र विभागात 33 वर्षांचा अनुभव असलेले हवामान शास्त्रज्ञ महेंद्र सपकाळे आणि त्यांच्या पत्नी मृणाल सपकाळे यांनी विकसित केलेलं ‘टिपिंग बकेट पर्जन्यमापकाची नेमकी वैशिष्टय काय आहेत? पाहूयात..

टिपिंग बकेट पर्जन्यमापक यंत्राच्या आडव्या रचनेमुळे उपकरणाची उंची कमी आणि हाताळण्यास सोपे होते...यात पावसाच्या प्रत्येक थेंबाची अचूक नोंद करण्यासाठी 'रीड-स्विच सेन्सर'चा वापर केला जातो...०.१ मिमी पासून ०.५ मिमी पर्यंत पावसाची तीव्रता मोजण्याची या यंत्रात सोय आहे... फनेलमध्ये पानं, धूळ किंवा इतर अडथळे निर्माण झाल्यास LDR सेन्सर डेटा लॉगरला सूचना देतो, ज्यामुळे वेळेवर देखभाल करता येते आणि डेटा गमावण्याचा धोका कमी होतो. तसंच पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी बर्ड स्पाइक्सची तरतूद करण्यात आली.

दरम्यान पारंपरिक पर्जन्यमापकं महागडी आणि देखभालीस कठीण असतात. मात्र, सपकाळे दाम्पत्याने बनवलेलं हे यंत्र ग्रामीण भागात सहज वापरता येण्यासारखं आहे. विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी हे अचूक मोजमाप यंत्र शेतकऱ्यांची मोठी ढाल ठरणार आहे.

सपकाळे दाम्पत्याचे हे संशोधन केवळ तांत्रिक नवकल्पना नसून ग्रामीण भागासाठी मोठा आधार ठरणार आहे. या यंत्राच्या माध्यमातून पीकविमा दाव्यांसाठी अचूक डेटा उपलब्ध होणार असल्यानं विमा कंपन्यांकडून दावे नाकारले जाण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या निर्मितीमुळे देशातील हवामान मापन तंत्रज्ञानाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com