मानखुर्दमध्ये क्रेन कोसळली, मुंबईची वाहतूक 22 तास ठप्प

Mankhurd Traffic Jam: मानखुर्दमध्ये क्रेन उलटल्यानं झालेल्या वाहतुक कोंडीत प्रवाशांचे मोठे हाल झाले... अशातच 15 मिनटांच्या प्रवासासाठी मुंबईकरांना तब्बल 5 तास कसे लागले? वाहतुक यंत्रणा कशी झोपलेली होती?
Commuters stuck for hours as a collapsed crane blocks the Sion-Panvel Highway in Mankhurd, Mumbai.
Commuters stuck for hours as a collapsed crane blocks the Sion-Panvel Highway in Mankhurd, Mumbai.saam tv
Published On

तारीख 28 एप्रिल..रात्री 10 वाजून 45 मिनिटं...ठिकाण.. मानखुर्द, सायन-पनवेल हायवे.मुंबई..खोदकाम करताना क्रेन रस्त्याच्या मधोमध कोसळली. दुर्घटनेत एका पोलिसांचा मृत्यू झाला.आणि मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली..

हीच परिस्थिती सकाळी ही कायम राहीली... चेंबूर ते मानखुर्द हे 15 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी मुंबईकर तब्बल 5 ते 6 तास अडकून पडले. पण कुणालाच त्यांच सोयरसुतक नव्हत..

प्यायला पाणी नाही... जवळपास टॉयलेट बाथरूम नाही...

त्यात ट्राफिकमधून दुसऱ्या दिशेला उलटं फिरून परत जाणंही अशक्या.अनेकांनी द्विटर हँडलवर संतप्त यासंदर्भात प्रशासनाच्या हलर्गीपणावर बोटं ठेवलं..रात्र उलटून 29 एप्रिलचा दिवस उजडला... आणि सकाळी तब्बल 12 तास उलटून गेल्यावर सकाळी 10 वाजता रस्त्याच्या मधोमध पडलेली क्रेन हलवण्याचं काम सुरु झालं... मात्र 12 तास उलटूनही ही कोंडी कायम राहिली...

अंतर 15 मिनिटांचं, वेळ 6 तास !

चेंबूर ते मानखुर्द हे 15 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी प्रवाशांना 5 ते 6 तास लागले

मानखुर्दमध्ये क्रेन हटवण्यासाठी ऐन गर्दीच्या वेळी रस्ता रोखल्यानं वाहतुकीचा बोजवारा

महापुरापेक्षाही भयंकर कोंडीत हजारो मुंबईकर अडकले, महिला-मुलं, रुग्णांचे हाल

अटल सेतूचा वापर करण्याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती का मिळाली नाही?

मानखुर्दमधील क्रेन दुर्घटनेचा फटका ट्रॅव्हल्सनाही बसला

अखेर 22 तासानंतर क्रेन उचलण्यात यंत्रणेला यश आलं ..मात्र या 22 तासात गुदमरलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांचं काय...

आता हे दृष्य पाहा..अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच

4 फेब्रुवारी 2026

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेजवळील आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटला......तब्बल 33 तास वाहतुक कोंडीत प्रवाशांचे अतोनात हाल झाले.. मुंबई- सातारा प्रवास तब्बल 18 तासांनी रखडलेला

घटना जरी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असल्या तरी त्यात एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे झोपलेल्या यंत्रणा..त्यांच्यातला समन्वयाचा अभाव..आणि वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी आलेले अपयश..आणि अडकलेल्या लोकांबद्दल पराकोटीची अनास्था...त्यांच्याशी कुणालाच देणघेणं नाही...

एकीकडे अटल सेतू, मिसिंग लिंक प्रकल्प यांसारख्या अनेक महत्तवकांक्षी प्रकल्पांची काम सुरु आहेत... ज्या रस्त्यावरून सर्वसामान्य मुंबईकरांची येजा होत असते तोच रस्ता तब्बल 22 तासांसाठी ठप्प होत असेल... तर हा विकास आहे की मुंबईकरांना गुदमरून मारण्याचा प्रकार .....यंत्रणांचा हा हलर्गीपणा मुंबईकरांच्या जीवावर उठण्याची वेळ प्रशासन बघतयं का? आता तरी घटनेतून प्रशासन काही धडा घेणार का आणि सामान्य प्रवाश्यांना वाऱ्यावर सोडून फक्त टोलचेच पैसे वसूल करत राहणार...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com