कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार? कामगारांवर आता कायद्यानं कुऱ्हाड

New Labour Code Sparks Fear Among Workers आधीच एआयमुळे नोकर कपातीचं संकट निर्माण झालेलं असतानाच आता राज्य सरकारच्या निर्णयानं कर्मचारी वर्गाचं टेंशन वाढणार आहे. केंद्रानंतर आता राज्य सरकारन नव्या कामगार संहितेसंदर्भात नवी नियमावली जाहीर केलीये. पाहूयात यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट...
Workers express concern as Maharashtra unveils new labour rules that may impact job security.
Workers express concern as Maharashtra unveils new labour rules that may impact job security.saam tv
Published On

एआयमुळे आधीच नोकरकपातीचं संकट निर्माण झालेलं असतानाच आता राज्य सरकारनं कामगारांवर कायद्यानं कुऱ्हाड चालवण्यास सुरूवात केलीये. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारनंही कामगार आणि मालकांसाठी दोन वेगवेगळ्या नियमावली तयार केल्यात. त्यामुळे आगामी काळात कामगारांच्या नोकरीवर टांगती येणारेय. नव्या नियमावलीनुसार राज्यात कायद्यानं कर्मचारी कपात कशी केली जाणार आहे पाहूयात...

300 कर्मचारी असलेल्या आस्थापनांना कपातीसाठी सरकारी परवानगीची अट रद्द करण्यात येणार आहे. पूर्वी हीच मर्यादा 100 कामगारांपर्यंत होती.तसंच, आधी कामगार संघटनांना संपाकरिता परवानगीची गरज नव्हती. मात्र, आता कामगार संघटनांना संपावर जाण्याआधी पूर्वसूचना देणं अनिवार्य करण्यात आलंय. नव्या मसुद्यावर 45 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 50% असणं आवश्यक असून नव्या नियमावलीत PF आणि निवृत्ती लाभांवर भर देण्यात आलाय. नव्या नियमावलीनुसार 'गिग' कर्मचाऱ्यांनाही सामाजिक सुरक्षा आणि विमा लाभांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

खरंतर, कामगार, मालक हितसंबंध जपणाऱ्या नियमावलीनं कामगारवर्गातच भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एव्हंढच नाहीतर या नियमावलीमुळे देशाचं आर्थिक चक्र थांबवणार असल्याचं कामगार नेत्यांनी म्हणटलंय..

केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत राज्य सरकारनं 'महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम 2026' चा नवा मसुदा जाहीर केलाय. 'ईझ ऑफ डुइंग बिझनेस'च्या नावाखाली सरकारनं उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी कामगारांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. खरंतर, महिनाभरानंतर या नियमावलीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. मात्र, तोपर्यंत राज्यातील कर्मचाऱ्यांवर धोक्याची घंटा कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com