पुण्यात बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर चाकूने वार केले
पुण्यातील चंदननगरमध्ये घडली घटना
लग्न ठरल्याच्या रागातून केला हल्ला
आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत
पुण्यामध्ये तरुणाने गर्लफ्रेंडवर घरात घुसून चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्यासोबत लग्न ठरल्याच्या रागातून तरुणाने हे भयंकर कृत्य केले. पुण्यातील चंदननगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उजालादेवी दोहरे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. घरात घुसून बॉयफ्रेंडने तिच्यावर हल्ला केला. आरोपीने तरुणीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रियकर दिलीप राठोड नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, हा सगळा प्रकार पुण्यातील चंदननगर भागात २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडला. आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी हे दोघे पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकत्र काम करत होते. या ठिकाणी त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. दरम्यान, संबंधित तरुणी तिच्या मूळ गावी गेल्यानंतर तिच्या कुटुंबांनी तिचे लग्न ठरवले.
'आपले लग्न ठरलं आहे' हे तरुणीने आरोपीला सांगितले होते. तेव्हा आरोपी संतप्त झाला. हे लग्न मान्य नसलेल्या तरुणाने रागाच्या भरात २९ तारखेला तिच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार केले. गर्लफ्रेंडवर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी आरोपीविरोधात गु्न्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.