Maharashtra Politics News Raosaheb Danve Reaction On BJP Ticket to Jalana Loksabha Constituency Saamtv
महाराष्ट्र

Raosaheb Danve News: ही विचारांची लढाई; समोर कोणीही आलं तरी पराभव करु... रावसाहेब दानवेंना विश्वास

Jalna Loksabha Election 2024: जालना लोकसभा मतदार संघाच्या विकासाच्या कामात लक्ष दिल्यामुळे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून, पक्षाचे ध्येयधोरण लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे मला पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली," असल्याचं दानवे म्हणाले.

लक्ष्मण सोळुंके

Raosaheb Danve News:

"आमच्यासमोर कोण उमेदवार येईल याची चिंता आम्ही करत नाही. ही लढाई विचाराची लढाई आहे, ही व्यक्ती व्यक्तीची लढाई नाही," असं म्हणत उमेदवार कोणी जरी आला तरी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत जालन्यामधून रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालन्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

"गेले ४५ वर्षांची माझी राजकीय कारकीर्द आहे. या ४५ व वर्षात सरपंच पदापासून सभापती, आमदार, खासदार, केंद्रात दोन वेळा मंत्री, राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष अशा विविध पदावर काम केल्यानंतरही जालना जिल्ह्यातील जनतेशी सतत संपर्कात आहे. तसेच जालना लोकसभा मतदार संघाच्या विकासाच्या कामात लक्ष दिल्यामुळे आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून, पक्षाचे ध्येयधोरण लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे मला पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली," असल्याचं दानवे म्हणाले.

"आमच्यासमोर कोण उमेदवार येईल याची चिंता आम्ही करत नाही. ही लढाई विचाराची लढाई आहे. ही व्यक्ती व्यक्तीची लढाई नाही. उमेदवार कोणी जरी आला तरी जालना हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. पाच वेळेस मी, दोन वेळेस उत्तमसिंग पवार, आणि दोन वेळेस पुंडलिकराव दानवे भाजपाने सतत नऊ वेळेस हा मतदारसंघ जिंकलेला आहे, त्यामुळे समोर कोणीही असलं तरी आम्ही त्याचा पराभव करू" असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान 'भारत जोडोच्या (Bharat Jodo Yatra) माध्यमातून राहुल गांधी प्रकाश घेऊन येतील,' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या वक्तव्याला उत्तर देताना 'निवडणुकीनंतर राहुल गांधी प्रकाश आणतात की अंधार करतो हे संजय राऊत यांना कळेल,' असा खोचक टोलाही रावसाहेब दानवे यांनी यावेळी लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

SCROLL FOR NEXT