Ajit Pawar on Nilesh Lanke : महायुतीतला तो मंत्री कोण? अजित पवारांनी सांगितली, निलेश लंकेंच्या नाराजीच्या मागची इनसाईड स्टोरी

Ajit Pawar on Nilesh Lanke : निलेश लंके नाराज आहेत स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्यासोबत मी काल चर्चा केली होती. महायुतीतील एका मंत्री महोदयांच्याबद्दल त्यांनी मला तक्रार केली, असं अजित पवारांनी सांगितलं.
Ajit PAwar-Nilesh Lanke
Ajit PAwar-Nilesh LankeSaam TV

सचिन जाधव | पुणे

Maharashtra Political News :

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आजच  शरद पवार प्रवेश करणार आहेत, माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत राहिलेले निलेश लंके नाराज का झाले, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश लंके नाराज आहेत स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्यासोबत मी काल चर्चा केली होती. महायुतीतील एका मंत्री महोदयांच्याबद्दल त्यांनी मला तक्रार केली, असं अजित पवारांनी सांगितलं. यावरुन सतत अडचण येते, त्रास होतो. त्यामुळे ते नाराज आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit PAwar-Nilesh Lanke
Ajit Pawar on Nilesh Lanke : निलेश लंके राष्ट्रवादी सोडणार?; अजित पवार म्हणाले, 'त्याच्या डोक्यात हवा घातलीय'

मी निलेश लंकेंना म्हणालो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपण बसून चर्चा करुयात. ज्या मंत्र्यांच्याबद्दल नाराजी हे त्यांनाही आपण बोलूया. यातून जे काही समज-गैरसमज झाले असतील, कुणाचा कमी लेखलं जात असेल त्याबाबत चर्चा करु. आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील ते देखील सोडवू, असं अजित पवार यांनी म्हणाले. (Latest Marathi News)

आता निलेश लंकेंनी चुकीचा भूमिका घेऊ नये. निलेश लंके आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे. त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर त्यांना आधी राजीनामा द्यावा लागेल, असंही अजित पवार यांनी स्पषपणे सांगितलं.

Ajit PAwar-Nilesh Lanke
Political News : निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार?; विश्वसनीय सूत्रांची 'साम टीव्ही'ला माहिती

निलेश लंके यांनी स्पष्ट बोलणं टाळलं

निलेश लंके शरद पवार गटातील प्रवेशाबाबत अजूनही स्पष्टपणे बोलण्यास टाळत आहेत. आज निलेश लंके यांच्या 'मी अनुभवलेला कोविड' या पुस्तकांचं शरद पवार याच्याहस्ते प्रकाश होणार आहे. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी निलेश लंके पुण्याला निघाले आहेत.

त्याआधी निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी वाजवण्यात आली. अनेक कार्यकर्ते आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर गोळा झाले. यावेळी वेळ आणि काळच उमेदवार ठरवेल, असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com