Prakash Ambedkar on Mumbai Maratha March  Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: 'शिंदेंना फायदा; भाजपचे नुकसान...' मराठा आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Prakash Ambedkar On Loksabha Election: लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे 42 उमेदवार ठरले असून महाविकास आघाडीने सोबत घेतले तर त्यांच्या सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

भारत नागणे

Prakash Ambedkar News:

मराठा समाजाला ओबीसी सवलती दिल्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे होणार आहे. तर या मुळे ओबीसीला जवळ घेणाऱ्या भाजपला मात्र मोठे नुकसान होईल असे महत्वाचे विधान विधान वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पंढरपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

"काल (२७, जानेवारी) आपण नवी मुंबईमध्ये होतो. मराठा कार्यकर्ते भेटत होते त्यातून जाणवले इतर मराठा नेते झोपलेत. त्यांच्या बदल चीड तयार झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती वाढली आहे. जरांगे यांच्या सभेतून एक जाणवले ते वंचितबद्दल सकारात्मक बोलत होते. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना वाढवली पाहिजे असाही सूर त्यांचा जाणवला," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपवर निशाणा...

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून जो ओबीसी मतदार आपल्याकडे खेचण्याचा खेळ सुरू होता. पण आता त्यांनी धर्माच्या नावावर फसवले आहे. अशी भावना ओबीसीमध्ये वाढत आहे. कालच्या निर्णयाने भाजपला नुकसान होणार आहे, असे स्पष्ट मतही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन्यथा स्वतंत्र लढू...

"लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे 42 उमेदवार ठरले असून महाविकास आघाडीने सोबत घेतले तर त्यांच्या सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे. इंडिया आघाडीचे (India Aaghadi) अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही. ममता आप वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. सपा आणि काँग्रेसमध्ये (Congress) वाद आहेत, आता काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची गरज वाटत आहे," असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT