Pankaja Munde: पंकजा मुंडेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, 'आता तुम्ही...'

Pankaja Munde on Manoj Jarange: जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSaam tv
Published On

Pankaja Munde Latest News:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातून मुंबईच्या वेशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वेशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मराठा आरक्षावर भाष्य केलं आहे. 'एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं. लोकांमधील वितुष्ट कमी करावं, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. तर यावेळी सरकारने ओबीसीला धक्का कसा लागला नाही ? हे समजावून सांगावं, असं आवाहन मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pankaja Munde News
Manoj Jarange यांची वाशीमध्ये विजयी सभा, सभेत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लागणार नाही. मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते. मात्र धक्का लागलाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं. त्यामुळे धक्का लागला नाही, असं म्हणणं अयोग्य आहे'.

Pankaja Munde News
Manoj Jarange On Reservation | ओबीसी-मराठा वाद होऊ देणार नाही- जरांगे!

'ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे. जे सत्तेत विराजमान आहेत, ते जर म्हणत असतील ओबीसींना धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं, कसा धक्का लागला नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com