Raj Thackeray On Jarange
Raj Thackeray On JarangeSaam Digital

Raj Thackeray On Jarange: तुमचं अभिनंदन! पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचाराच; राज ठाकरेंनी सांगितलं मराठा आरक्षणामागील राजकारण

Raj Thackeray On Jarange: मराठा आरक्षणावरील अध्यादेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सुपूर्द केला आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी सरकारने मागण्या मान्य केल्याबद्दल मनोज जरांगेंचं अभिनंदन केलं आहे. मात्र त्यांनी जरांगेंना एक विनंतीही केली आहे.
Published on

Raj Thackeray On Jarange

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज अंतरवाली सराटी येथून पायी नवी मुंबईत दाखल झाला. लाखोंच्या सख्येंने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचण्याआधीच राज्य सरकारने मराठा बांधवांना गुडन्यूज दिली. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सुपूर्द केला आहे. दरम्यान मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सरकारने मागण्या मान्य केल्याबद्दल मनोज जरांगेंचं अभिनंदन केलं आहे. मात्र त्यांनी जरांगेंना एक विनंतीही केली आहे.

राज ठाकरे यांनी यासंदर्भात X वर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत, मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन! सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सर्व पक्षांचे त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. राज्यात मराठा समाजाची संख्या मोठी आहे. गेले तीन ते चार महिने मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. दोनच दिवसापूर्वी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहोचला होता. मात्र राज्य सरकारने हा मोर्चा मुंबईतील प्रवेश करण्यापूर्वीच अध्यादेश काढला. त्यामुळे जरांगेंनी आरक्षण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

Raj Thackeray On Jarange
OBC Jan Morcha : छगन भुजबळ राजीनामा देतील आम्हांला खात्री आहे : डॉ.बी. डी.चव्हाण

सरकारने तातडीने काढलेल्या या अध्यादेशामुळे लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अध्यादेश काढला असा आरोप होत आहे. आरक्षणातील कायदेशीर अडचणी सरकारने स्पष्ट केल्या नाहीत. केवळ मराठा समाजाला खूश करून मुंबईतून माघारी पाठवलं अशी चर्चा आहे. राज ठाकरेंनीही आपल्या ट्वीटमध्ये लोकसभा निवडणुकांचा उल्लेख केला आहे.कदाचित मराठा समाजाची फसवणूक झाली असावी, असाही त्यांच्या बोलण्याचा अर्थ काढला जात आहे.

म्हणूनच त्यांनी जरांगेना विनंती केली आहे की, मराठा आरक्षण कधी मिळणार आहे, यासंदर्भात एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारा. म्हणजे मराठा समाजाला या अध्यादेशामागील खरी परिस्थिती समजेल.

Raj Thackeray On Jarange
Amravati Breaking News: धक्कादायक! मोर्शीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची तहसील कार्यालयात आत्महत्या, राज्यभरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com