Amravati Breaking News: धक्कादायक! मोर्शीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची तहसील कार्यालयात आत्महत्या, राज्यभरात खळबळ

Amravati Breaking News: मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मागील 252 दिवसापासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. दरम्यान रात्री टाकरखेड येथील धरणग्रस्त शेतकरी गोपाल दहिवडे यांनी तहसील कार्यालयातील पेंडालमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
Amravati Breaking News
Amravati Breaking NewsSaam Digital
Published On

Amravati Breaking News

मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मागील 252 दिवसापासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. दरम्यान रात्री टाकरखेड येथील धरणग्रस्त शेतकरी गोपाल दहिवडे यांनी तहसील कार्यालयातील पेंडालमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. आत्महत्येनंतर शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले असून मोर्शीत रास्तारोको आंदोलन सुरू करत मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जीनामा देण्याची मागणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे या सर्व मागण्याची शासनाकडून पूर्तता न झाल्यामुळे शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात मागील 252 दिवसापासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati Breaking News
Devendra Fadnavis: मराठा समाजाचा प्रश्न सुटणार; मराठा आणि ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांची महत्वाची प्रतिक्रिया

आत्महेत्येपूर्वी शेतकऱ्यांने सरकारविरोधात चिठ्ठी लिहली असून माझ्या मरणाला शासन प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. परंतु उमेशभाऊ चळवळ बंद करायची नाही... उमेशभाऊ माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेवू देऊ नये... सरकार बेकार उमेशभाऊ न्याय मांगा असे मजकूर असलेल्या चिठ्ठ्या आहेत. दरम्यान यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली, सरकारच शेतकऱ्यांकडे लक्ष नाही आहे, कोण सरकार चालवतय हे कळायला मार्ग नाही तर सरकार सांभळना नाही होतं तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्या अशी टिका यशोमती ठाकूर यांनी केली तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावता का? असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

Amravati Breaking News
Maratha Reservation: ही तर सरळसरळ मराठा समाजाची फसवणूक; अध्यादेशावरून एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com