Devendra Fadnavis: मराठा समाजाचा प्रश्न सुटणार; मराठा आणि ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांची महत्वाची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis News: मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या आहेत. त्या स्वरुपाचा अध्याधेश सरकारने काढला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

Devendra Fadnavis on Maratha Reservation:

मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या आहेत. त्या स्वरुपाचा अध्याधेश सरकारने काढला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असून पण निर्णय घेताना आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मला आनंद आहे की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. मनोज जरांगे यांचंही अभिनंदन करतो. या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल असे आम्ही आधीपासून सांगत होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis
Ajit Pawar News: 'शपथ खरी करुन दाखवली...' मराठा आरक्षणाच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

'कुणबी नोंदी असलेल्या रक्त नात्यातील लोकांना प्रमाणपत्र देता येईल, सरकारने मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे. हा निर्णय घेताना आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातील सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे, असेही फडणवीस म्हणाले.

छगन भुजबळांच्या नाराजीवर फडणवीस म्हणाले, ही कार्यपद्धती असते. भुजबळांना स्पष्ट सांगू इच्छितो की, ओबीसींवर अन्याय होणार नाही. कायदेशीर अडचण होती, ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली. भुजबळांचं ही लवकर समाधान होईल अशी अपेक्षा आहे'.

Devendra Fadnavis
Maratha Reservation: ही तर सरळसरळ मराठा समाजाची फसवणूक; अध्यादेशावरून एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा

'क्युरिटीव्ह पिटीशन आणि सर्व्हे या दोन्ही बाबी सुरु आहे. मराठा मोठा समाज आहे. सर्वेक्षण सुरु आहे. क्युरेटिव्हमध्ये मार्ग निघाला नाही. तर दुसरा मार्ग सर्वेक्षण सुरुच आहे. क्युरेटिव्हमधून निघेल अशी आशा आहे. मागत्या वेळेला न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या. त्या सर्व्हेमधून दूर करण्याचे प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाही - फडणवीस

'गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे. त्यात आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाईल. मात्र घर जाळणे, थेट हल्ला करणे, एसटी जाळणे हे गुन्हे कोर्ट आदेशाशिवाय मागे घेता येणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com