Ashok Shankarrao Chavan News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बालवाडीतील मुलंसुद्धा सांगतील; हा जॉनी कोण? शरद पवार गटाचा भाजपला खोचक टोला; ट्वीट व्हायरल

Ashok Chavan Joining BJP: अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आदर्श घोटाळ्याचे गंभीर आरोप असलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याने विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत आहेत.

Gangappa Pujari

Mahrashtra Politics:

काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आदर्श घोटाळ्याचे गंभीर आरोप असलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याने विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटानेही खोचक ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे.

काय आहे राष्ट्रवादीचे ट्वीट..?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अधिकृत एक्स हँडलवरुन खोचक कविता ट्वीट करत अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरुन निशाणा साधला आहे." Johneyy Johnny Yes Papa? Eatingh Khoke ? No papa! Leaving Party? No papa! Afraid of ED? No Papa! Telling Lies? No papa! Open your mouth !!! भा..ज.. पा..' असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. तसेच बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..!, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊतांचे टीकास्त्र...

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरुन संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण स्वतःचे बारा वाजवून घेत आहेत. चव्हाणांनी शहिदांचा अपमान केल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात, आता त्यांना पक्षात घेऊन भाजपने शहिदांचा अपमान धुवून टाकला का? असा सवालही राऊतांनी (Sanjay Raut) उपस्थित केला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज पक्षप्रवेश..

दरम्यान, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा आजच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. आज दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. दरम्यान, भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याचीही शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT