सातारा जिल्ह्यातील कराड वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार मनोज शिंदे (traffic cop manoj shinde) यांनी संपुर्ण सातारा जिल्ह्यात दमदार कामगिरी केली आहे. शिंदे यांनी वर्षभरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांकडुन 19 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडुन शिंदे यांचे कौतुक होत आहे. (Maharashtra News)
शिंदे यांनी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असणाऱ्या 400 बुलेटस्वरांवर कारवाई करत 4 लाखांवर दंड वसुल केला आहे. याबराेबरच शिंदे यांनी बुलेटधारकांचे समुपदेशन करुन पाच वर्षात जवळजवळ 2000 च्या वरती बुलेटचे सायलेन्सर बदलून घेतले आहेत.
मनोज शिंदे यांची दबंग वाहतुक पोलिस अशी ओळख सातारा जिल्ह्यात आहे. बुलेटच्या अल्टर सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजामुळे वृद्ध, महिला,लहान मुले यांच्यासह सामाजिक मानसिक स्वास्थ्य धोक्यात येत असल्याने समुपदेशनासह ते कारवाई करत.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान बुलेटचे सायलेन्सर अल्टर करुन कर्णकर्कश आवाज काढत धुम स्टाईल गाडी चालवणाऱ्यांवर शिंदे यांचे लक्ष असायचे. अल्टर सायलेन्सर बाबत शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहिले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.