Dharashiv : दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये सांगली- कोल्हापुरातील पुराचे पाणी आणणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Ranajagjitsinha Patil Latest Marathi News : या प्रकल्पासाठी अंदाजे १५ हजार कोटींचा निधी लागणार आहे असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले.
Ranajagjitsinha Patil
Ranajagjitsinha Patilsaam tv

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जागतिक बँकेचे पथक पाहणीसाठी धाराशिव जिल्ह्यात येत असल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (ranajagjitsinha patil) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले कोल्हापूर (kolhapur) व सांगली (sangli) जिल्ह्यातील महापुराचे पाणी वळवून धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी आपण आग्रही होतो. याला पूरक प्रकल्पाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पुढाकाराने जागतिक बँकेचे पथक उद्या (ता. 14) धाराशिव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. हे पथक कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी करेल.

Ranajagjitsinha Patil
Ram Shinde News : सरकारची दिशाभूल करणा-या कार्यकरी अभियंत्यास निलंबित करा : आमदार राम शिंदे

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली. या प्रकल्पाला जोडून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात वळवणेसाठी १०० किलाेमीटर बोगद्यातून पुराचे पाणी नीरा नदीत सोडण्यात येणार असून उद्धट बॅरेज मधून पुढे ते उजनी धरणात सोडले जाणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिथून पुढे ते घाटने बॅरेजच्या माध्यमातून रामदरा तलावात सोडून जिल्ह्यात आणायचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १५ हजार कोटींचा निधी लागणार आहे असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Ranajagjitsinha Patil
Ashok Chavan On Maratha Reservation New GR : ...तरच सकल मराठा समाजाला न्याय मिळेल : अशाेक चव्हाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com