बीड - परळी महामार्गावरील जिरेवाडीजवळ गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पुलाच्या याच अर्धवट कामामुळे परळी येथील डॉक्टरचा अपघातात बळी गेला आहे.
डॉ. वाल्मीक मुंडे असे अपघातात जागीच ठार झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर डॉ. प्रवीण खाडे हे जखमी झाले आहेत. जखमी डॉ. खाडे यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परळीच्या जिरेवाडी बायपास रोडवर गावालगत एका ठिकाणी नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी प्रगतीपथावरील कामाचा कोणताही दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. तसेच नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यामुळे वाहन चालवताना अनेक वाहन चालकांना अडचणी येत आहेत. याच रस्त्यावरून डॉ. प्रवीण खाडे व डॉ.वाल्मीक मुंडे हे दोघेजण कारने परळीहून जिरेवाडीकडे येत होते. यादरम्यान नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने त्यांची कार रस्त्यावर पडलेल्या पाईपला धडकुन खाली खड्ड्यात कोसळली.
या अपघातात डॉ. वाल्मीक मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. प्रविण खाडे हे जखमी झाले आहेत. दरम्यान अत्यंत कमी दरात रुग्णसेवा करणारे डॉक्टर असा वाल्मीक मुंडे याचा नावलौकिक होता. त्यांच्या मृत्यूने तालुक्यातील गरीब रुग्णांसाठीचा आरोग्यदूत हरवल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.