Nawab Malik News Saamtv
महाराष्ट्र

Nawab Malik News: नवाब मलिकांचा पाठिंबा कोणाला? सुप्रिया सुळेंनंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली भेट; निर्णयाकडे लक्ष

Maharashtra NCP Crisis: जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिकांचा पाठिंबा कोणाला मिळणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी...

Maharashtra Politics: दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात २ महिन्यांचा जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिकांचा पाठिंबा कोणाला मिळणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नवाब मलिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात असून अजित पवार गटाकडून त्यांना प्रस्तावही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकृतीच्या कारणामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन मंजूर झाला. जेलमधून बाहेर येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर या प्रमुख नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली.

या भेटीत अजित पवार गटाकडून नवाब मलिकांना पक्षात येण्याबाबत प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अजित पवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता नवाब मलिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सुप्रिया सुळेंनीही घेतली होती भेट...

कालच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sul) यांनीही नवाब मलिक यांची भेट घेतली होती. सुप्रिया सुळे यांनी तब्बल चार तास नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली होती. आता नवाब मलिक काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर नवाब मलिक तटस्थ राहण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Leave: नोरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार

HBD Rekha : ७१ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, रेखा यांच्या लांबसडक केसामागचं रहस्य काय?

कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT