Ajit Pawar News: लपून गेलो नाही; पुतण्याने काकांना भेटण्यात गैर काय? शरद पवारांच्या भेटीवर अजित पवार पहिल्यांदाच बोलले

Sharad Pawar Ajit Pawar Meeting: राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या काका पुतण्याच्या गुप्त भेटीबद्दल अखेर अजित पवारांनी खुलासा केला आहे.
Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet
Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar MeetSaam Tv
Published On

Maharashtra Politics: आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. देशभर उत्साहाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहन करण्यात आले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरमध्ये तर अजित पवार यांनी कोल्हापूरात ध्वजारोहन केले. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांच्या भेटीवर पहिल्यांदाच खुलासा केला.

Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet
CM Eknath Shinde News: स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्याचा प्रयत्न... स्वातंत्र्यदिनी CM एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा

काय म्हणाले अजित पवार?

"शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेताना लपून गेलो नाही. शरद पवारांसोबत भेट घेत असतो. भविष्यात पवारांना भेटल्यास वेगळा अर्थ घेऊ नका. शरद पवारांसोबत कौटुंबिक भेट घेत असतो. शरद पवार वडीलधारे म्हणून भेटलो. शरद पवारांशी भेटीत राजकीय चर्चा नाही.. असे म्हणत पुतण्याने काकांची भेट घेतल्यास गैर काय? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

तसेच यावेळी अजित पवार (Ajit Pawr) यांनी "ही भेट लपून झालेली नव्हती. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकता आहे, मी त्या गाडीत नव्हतोच.. असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. या भेटीचा वेगळा अर्थ काढून नका, ही कौटुंबिक भेट होती," असेही ते पुढे म्हणाले.

Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet
PM Narendra Modi Speech: स्वातंत्र्यदिनी OBC बांधवांना मोठं गिफ्ट; PM मोदींनी केली विश्वकर्मा योजनेची घोषणा

नवाब मलिकांना अजित पवार गटाकडून प्रस्ताव...

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना २ महिन्यांचा जामीन मंजुर झाला. नवाब मलिक यांच्या सुटकेनंतर ते आता कोणत्या गटाला पाठिंबा देणार याची उत्सुकता लागली असतानाच अजित पवार गटाकडून त्यांना प्रस्ताव देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

आज नवाब मलिक यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी भेट घेतली. या भेटीत ही चर्चा झाल्याचे समोर येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com