Nana Patole Speech: सुप्रीम कोर्टाचे जज सांगतात आमच्याच जीवाला धोका आहे; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole Speech For Independence Day 2023: पुन्हा एकदा पारतंत्र्यात जातोय की काय अशी भीती वाटतेय", स्वातंत्र्य दिनी पटोलेंनी पारतंत्र्यात जाण्याची भीती व्यक्त केलीये.
Nana Patole News
Nana Patole NewsSaam TV
Published On

Maharashtra Political News: "या देशाचे संविधान, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाचे जज सांगतात आमच्याच जीवाला धोका आहे. न्यायाधीशांचा जीव धोक्यात आहे. मग सांगा आपला देश कुठे जात आहे विचार करा.", अशा शब्दांत विरोधकांवर टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. (Latest Independence Day 2023)

मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त आजोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नाना पटोलेंनी असं म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधींच्या खासदारकीवरुन देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. "खोट्या गुन्ह्याच्या आधारावर राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने न्यायाची दारं उघडली. मणिपूरमध्ये आयाबहिणींची अब्रू लुटली जातेय. एक नाही तर ५ हजार घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा पारतंत्र्यात जातोय की काय अशी भीती वाटतेय", स्वातंत्र्य दिनी पटोलेंनी पारतंत्र्यात जाण्याची भीती व्यक्त केलीये.

Nana Patole News
Politics News : ठाकरे गटाच्या मुखपत्रातून राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोचरी टीका...

"संविधान जपण्याचे काम काँग्रेसने केलंय. खोट्या थापा देऊन काही लोक सत्तेत आलेत. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे ते बदलण्याचा हा डाव आहे. ज्या लोकांचं या स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही ते आपल्या देशात आहेत. काल या लोकांनी काळा दिवस साजरा केला. यांना स्वातंत्र्य नकोय काय? वैचारिक लढाई काँग्रेस लढत आहे.",असं नाना पटोलेंनी (Nana Patole) म्हटलंय.

सर्वांना ७६ स्वांतत्र दिनाच्या (Independence Day) शुभेच्छा. जे गेल्या काही वर्षात आपल्याकडे चालले आहे ते विसरून चालणार नाही. या देशाला संपवले जात आहे. महागाई वाढवली जात आहे. देशाला विकण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अशी खंत नाना पटोलेंनी यावेळी व्यक्त केलीये.

Nana Patole News
Nana Patole News | भूमिकांबाबत संभ्रम नको म्हणून उद्धव ठाकरेंची भेट घेतली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com