Sharad Pawar vs Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का, पुण्यातील बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश

Sharad Pawar vs Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसणार आहे. अजित पवार गटाचा बडा नेता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसणार आहे. अजित पवार गटाचे नेते प्रवीण माने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश करणार आहेत. इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने यांचा आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळेंना खासदारकी जाहीर झाल्यानंतर पक्षात काम करण्यास सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर ते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. पण आज पुन्हा ते शरद पवार यांच्यासोबत येत आहेत.

पुण्यात निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवार, रोहित पवार याच्या उपस्थितीत आज 5 वाजता प्रवीण माने प्रवेश शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

बाबाजानी दुर्राणीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

दरम्यान, मागील महिन्यात 27 जुलै रोजीही अजित पवार गटाचे बडे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, तिकीट न दिल्यानं दुर्राणींनी पक्ष सोडला. पटेल याना उत्तर देत बाबाजानी दुर्राणी म्हणाले होते की, 'कोणतीही मजबुरी नाही, साहेबांसोबत मी आधीपासूनच आहे.''

याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंचाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर पिंपरी-चिंचवडचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोरांची सोडचिठ्ठी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT