Manoj jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मराठा आंदोलकांकडून जरांगेंच्या दौऱ्याची तयारी करण्यात आली आहे. पण या दौऱ्याआधी देवेंद्र फडवीस (Devendra Fadanvis) यांचे विश्वासू अशी ओळख असणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांचे आंदोलन लवकरात लवकर संपवावं, यासासाठी आम्ही सर्व आमदार प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. राजेंद्र राऊत यांच्याशिवाय भाजपचे इतर आमदारही जरांगेंच्या भेटीला असेल.
मनोज जरांगे यांच्या भेटीला भाजपच्या तीन आमदारांनी थेट अंतरवली सराटीत धडक मारली . शिंदेंच्या एका शिलेदाराचीही या भेटीत हजेरी आहे. आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यासह जालन्यातील काही आमदारही जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल झाले. मनोज जरांगे यांच्या 7 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी तेढ निर्माण होत असताना पश्चिम दौऱ्याआधी भाजप आमदार आणि मनोज जरांगे यांच्यात काय चर्चा होतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भाजपचे आमदार राजेंद्र राऊत,आमदार राणा जगजीत सिंह पाटील,आमदार नारायण कुचे, आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे मनोज जारांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत आले होते. अंतरवाली सराटीमधील सरपंच यांच्या घरी जरांगे आणि आमदारांमध्ये चर्चा झाली.
जरांगे पाटील यांचे आंदोलन लवकरात लवकर संपवावं - आमदार राजेंद्र राऊत
सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये समन्वय साधून हे आंदोलन कुठे चिघळणार नाही. लवकरात लवकर हे आंदोलन संपवावं हा आमचा आमदार मंडळींचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भेटीनंतर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीय. आज ज्या मागण्यांवर चर्चा झाली त्या मागण्या मंगळवारी - बुधवारी सरकारसमोर ठेवू याबद्दल सरकार निश्चित विचार करेल. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तोडगा निघेल. हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा यासाठी आम्ही प्रयत्न करू.सरकार आणि मनोज जरांगे यांच्या मध्यस्थीने चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटावे ही आमची प्रामाणिक भावना असल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.