मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान हे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. पण सरकारी वकिलांनी अटक वॉरंट रद्द करण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना झापलं.
सुनावणीदरम्यान कोर्टाने असे सांगितले की, 'कोर्टाचा आदेश असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील कोर्टात हजर राहिले नाही. त्यामुळे प्रकरण जुने आहे. त्याचा निपटारा लवकर होणे आवश्यक आहे. जरांगे यांनी समाज मध्यावर कोर्टाबाबत जे वक्तव्य केले आहे ते कोर्टासमोर सरकारी वकील यांनी आणून दिलं आहे. त्यांनी कोर्टाचा अवमान केला आहे पुन्हा तसं करू नये.'
तसंच, 'कोर्ट कोर्टाच्या भूमिकवर ठाम आहे. अशा टिप्पणीमुळे मनोज जरांगे यांनी दक्षता बाळगावी कोर्टाबाबत कोणत भाष्य करू नये. मनोज जरांगे यांना गैरहजर राहिले म्हणून नवीन कायद्याप्रमाणे नेमल्या तारखेस अनुपस्थित सहज घेता येणार नाही कायदा आणि दंड लक्षात असणं आवश्यक आहे. मनोज जरांगे नवीन बंध पत्र देणे आवश्यक आहे.', असे देखील कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले.
नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे अटक वॉरंट काढले आहे. यापूर्वीही जरांगे यांच्याविरोधात कोर्टात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर जरांगे मे अखेरीस कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर कोर्टाने जरांगे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर हे वॉरंट रद्द केले होते. परंतू त्यानंतरही जरांगे सुनावण्यांना गैरहजर राहिल्याने पुन्हा कोर्टाने त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले होते. पण आता कोर्टाने हे अटक वॉरंट रद्द केले आहे.
या सुनावणीदरम्यान जरांगे पाटील यांच्या वकिलांनी सांगितले की, 'जरांगे उपोषणाला बसले होते त्यानंतर त्यांना चालता येत नव्हतं. संभाजीनगरला गॅलक्सी रुग्णालयालात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. किडनीला इन्फेकशन झाल्याने २ आठवडे ते रुग्णालयातच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता त्यामुळे कोर्टासमोर ते आले नाहीत. आता देखील त्यांना जास्त वेळ उभं राहता येत नाही. डॉक्टरांनी प्रवास टाळायला सांगितला आहे. तरी देखील ते रुग्णवाहिकेतून कोर्टासमोर हजर झाले. ते या सगळ्या खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहेत. काढलेलं वॉरंट कॅन्सल करण्यात यावं. संभाजीनगर येथील एमडी डॉक्टरांचे अहवाल देखील आहेत. त्यामुळे यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते येऊ शकत नव्हते.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.