Manoj Jarange : विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपाटले, किती जागांवर निवडणूक लढवणार? वाचा...

Manoj Jarange Vidha Sabha Election : राज्य सरकारने अद्यापही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नसल्यानं मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत.
 विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपाटले, किती जागांवर निवडणूक लढवणार? वाचा...
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही

राज्य सरकारने अद्यापही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नसल्यानं मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपाटले असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. येत्या 7 ऑगस्टपासून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासोबतच इतर समाजातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

 विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपाटले, किती जागांवर निवडणूक लढवणार? वाचा...
Maharashtra Politics : मोठी बातमी! शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस; नेमकं कारण काय?

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुका निहाय इच्छुकांनी आपली माहिती अंतरवाली सराटीमध्ये आणून द्यायची आहे, असं सांगण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या विधानसभा निवडणुकीत 150 ते 200 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तसेच 7 ऑगस्टपासून मनोज जरंगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन दौरा करणार आहेत.

त्यानंतर 13 ऑगस्टपासून इच्छुकांनी दिलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. इच्छुकांना स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल. 7 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी (Jalna News) येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. अर्जाच्या छाननीसाठी कोअर समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील, अशी विधानसभा निवडणुकीसाठीची रचना आखण्यात आली आहे.

दरम्यान, 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निहाय कोण कोण उभे राहणार या संदर्भातली माहिती जाहीर करण्याची शक्यता आहे. जर राज्य सरकारने सगेसोयरे आणि मराठ्यांना कुणबीमध्ये आरक्षण दिले तर निवडणुकीच्या तयारी ऐवजी जल्लोषाची तयारी करून राज्यभर जल्लोष केला जाणार आहे.

मनोज जरांगे मध्यरात्री 2 वाजता पुण्यात दाखल

प्रकृती बरी नसताना देखील मनोज जरांगे पाटील गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मनोज जरांगे यांच्यासह 2 जणांविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते.यानंतर त्यांच्या वकिलांनी ते २ ऑगस्ट रोजी हजर राहतील, असा अर्ज कोर्टाला दिला होता.

 विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपाटले, किती जागांवर निवडणूक लढवणार? वाचा...
Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर परदेशात पळून गेली? अटकेच्या भीतीने फरार झाल्याची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com