Congress MLA Jitesh Antapurkar Resign:  Saam TV
महाराष्ट्र

Congress MLA Resign: काँग्रेस आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, आज भाजपात करणार प्रवेश

Congress MLA Jitesh Antapurkar Resignation Updates: आज ते भाजपमध्ये प्रवेश कऱणार आहेत. आज सायंकाळी मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड|ता. ३० ऑगस्ट २०२४

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे देगलुर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी तडकाफडकी आमदारकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकांपासून जितेश अंतापुरकर हे पक्षाच्या रडारवर होते, अशातच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसमधून दोन आमदारांची हाकालपट्टी -

विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये आमदार जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांच्या नावाचा समावेश होता. महाराष्ट्र काँग्रेसकडून याबाबत दिल्लीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. आता काँग्रेसने याबाबत कारवाई करत या दोन्ही आमदारांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. झिशान सिद्दीकी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय.

भाजपात प्रवेश करणार -

नांदेडच्या देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामाही दिलाय. आज ते भाजपमध्ये प्रवेश कऱणार आहेत. आज सायंकाळी मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अशोक चव्हाण यांचे निकवर्तीय

जितेश अंतापुरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हापासून अंतापूरकर हे भाजपाच्या संपर्कात होते. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याने ते त्यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या.आज ते भाजपामध्ये पक्ष प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT