Mahadev Jankar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीची डोकेदुखी वाढली, महादेव जानकरांनी शड्डू ठोकला, १०० जणांची पहिली यादी येणार, बारामतीमध्येही उमेदवार उतरवणार?

Mahadev Jankar: रासपचे नेते महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडले. ते २८८ जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे. लवकरच जागावाटपाचा निर्णय हे पक्ष जाहीर करण्याची शक्यता आहे. काही पक्षांची पहिली यादी तयार असून ते लवकरच जाहीर करतील. अशामध्ये घटक पक्षामुळे महायुतीचे टेन्शन वाढलं आहे. रासपचे नेते महादेव जानकर २८८ जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. महादेव जानकर हे महायुतीमधून बाहेर पडले. त्यांनी उमेदवारांची पहिली यादी तयार केली असून उमेदवाराची नावं ते लवकरच जाहीर करतील. दोन दिवसांमध्ये ही यादी जाहीर होईल.

महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या यादीत बारामतीच्या उमेदवाराचे नाव असण्याची शक्यता आहे. रासपची १०० उमेदवारांची पहिली यादी असणार आहे. महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडले आहेत. महायुतीच्या विरोधातच महादेव जानकर यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. जानकरांनी २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करत महायुतीला इशारा दिला होता.

पहिल्या यादीत सुमारे २५ उमेदवारांना तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेली अनेक वर्षे रासपचे काम करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना यादीत संधी मिळणार आहे. बारामतीमध्ये रासपचे जिल्हाध्यक्ष राहीलेल्या संदीप चोपडे यांना रासपचे तिकीट मिळणार आहे. ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आहेत.

इंदापूरमध्ये तानाजी शिंगाडे हे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. जतमध्ये रासपचे युवा नेते अजितकुमार पाटील यांना सांगली जिल्ह्यातील जतमध्ये संधी मिळणार आहे. सांगोलामध्ये आबा मोटे हे रासपचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते सध्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. अक्कलकोटमध्ये सुनील बंडगर हे रासपचे विभागीय उपाध्यक्ष आहेत. तर पनवेलमध्ये सुदाम जरग हे रासपचे कोषाध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महादेव जानकर यांना राज्यपाल नियुक्त यादीत नाव असेल असं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र नाव नसल्याने जानकर नाराज झाले आणि त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परभणी लोकसभेला पराभूत झाल्यानंतर महादेव जानकर राज्यपाल नियुक्त कोट्यातून इच्छुक होते. महायुतीने विचारात न घेतल्याने महादेव जानकर नाराज होते. अखेर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

रासपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं -

बारामती (जि. पुणे) - संदीप चोपडे

इंदापूर (जि. पुणे) – तानाजी शिंगाडे

पाटण (जि. सातारा) – विठ्ठल यमकर

जत (जि. सांगली)- अजितकुमार पाटील

सांगोला (जि. सोलापूर)- आबा मोटे

अक्कलकोट (जि. सोलापूर)- सुनील बंडगर

पनवेल (जि. रायगड) – सुदाम जरग

परंडा (जि. धाराशिव) – नाना मदने

तुळजापूर (धाराशिव)- आश्रुबा कोळेकर

आष्टी पाटोदा (जि. बीड)- शिवाजी शेंडगे

राहुरी (जि. अहिल्यानगर) – नाना जुनधारे

अंबरनाथ (जि. ठाणे) – रूपेश थोरात

जिंतूर (जि. परभणी) – अशोक हाके

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT