Maharashtra Politics: 'बहिणीचे जे हाल झाले, तेच भावाचे होणार', अंबादास दानवे यांचा महादेव जानकर यांना खोचक टोला

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. यावरूनच अंबादास दानवे यांनी जानकर यांना टोला लगावला आहे.
Ambadas Danve On Mahadev Jankar
Ambadas Danve On Mahadev JankarSaam Tv

Ambadas Danve On PM Modi:

>> भरत नागरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज परभणीत प्रचार सभा पार पडली. या सभेत त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जानकर यांना टोला लगावला आहे. बहिणीचे जे हाल झाले, तेच भावाचे होणार, असं म्हणत भावना गवळी यांचं नाव न गेट त्यांनी जानकर यांना टोला लगावला. हिंगोलीत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे आणि आणि त्यांचा पक्ष राजकारणातून संपणार या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर दानवे म्हणाले की, ''हे खरं आहे. भाजपने आतापर्यंत ज्यांना सोबत घेतलं, ते सर्व पक्ष संपून टाकले आहेत. वापरा आणि फेकून द्या, हे भाजपने चालवले आहे. जेवढ्या जागा शिंदेंकडे होत्या तवढ्या देखील त्यांनी लढवल्या नाहीत.''

Ambadas Danve On Mahadev Jankar
Maharashtra Water Crisis: नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त, जनता हंडाभर पाण्यासाठी त्रस्त; ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, ''महायुतीचे संभाजीनगरचे उमेदवार संदिपान भुमरे हे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. पालकमंत्री असताना त्यांनी काय काम केलं, हे दाखवावं.''

दानवे म्हणाले आहेत की, ''पंतप्रधानांना महाराष्ट्रात एवढ्या सभा घ्याव्या लागत आहेत. यातूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे, हे स्पष्ट झालं आहे. त्यांचा प्रचार हा पुळचट आणि पोचट झाला आहे.''

Ambadas Danve On Mahadev Jankar
Sambhajinagar Lok Sabha: संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांची होणार लढत, चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध संदीपान भुमरेंना शिंदे गटाने दिली उमेदवारी

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे हे शिवरायांना मानत नाही, असे विधान केले होते. यावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले,''देवरा आम्हाला शिवराय शिकवणार का, देवरा स्वतःच्या वडिलांना मानत नाही, ते आम्हाला शिकवणार का?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com