Sambhajinagar Lok Sabha: संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांची होणार लढत, चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध संदीपान भुमरेंना शिंदे गटाने दिली उमेदवारी

Sandipanrao Bhumre: एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अखेर संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
chhatrapati sambhajinagar loksabha election 2024
Sandipan Bhumre Against Chandrakant KhaireSaam Tv

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency:

>> सुरज मसुरकर

एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अखेर संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भूमरे यांना शिंदे गटाने रिंगणात उतरवलं आहे. येथून आधीच ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध भुमरे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या एकदिवस आधीच म्हणजे शुक्रवारी 'साम टीव्ही' याबाबत बातमी दिली होती. ज्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे.

chhatrapati sambhajinagar loksabha election 2024
PM Modi: 'जसं अमेठी सोडावं लागलं, तसंच आता वायनाडही सोडणार', राहुल गांधींवर PM मोदींची सडकून टीका

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने आजच परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यातच शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट दोन शिवसैनिक आमनेसामने आले आहेत. संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. मात्र ही जागा अखेर शिंदे गटाच्या पारड्यात पडली असून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी संदीपान भुमरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील बडे नेते उपस्थित राहू शकतात. यावेळी मोठं शक्तिप्रदर्शनही शिंदे गटाकडून केलं जाऊ शकतं.

chhatrapati sambhajinagar loksabha election 2024
Rais Shaikh: राज्यात समाजवादी पक्षाला मोठा धक्का, रईस शेख यांची पक्षाला सोडचिठ्ठी; अजित पवार गटात करणार प्रवेश?

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे येथील विद्यमान खासदार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. या निवडणुकीत एमआयएमनेही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे येथे यंदा तिहेरी लढत पाहायला मिळू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com