Kalyan News : जागा कोणाच्याही वाट्याला आली तरी महायुती म्हणून प्रामाणिकपणे काम; शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांची भूमिका

Kalyan News : कल्याण पश्चिम मतदार संघावर भाजपने धावा केला आहे. याबाबत बोलताना विश्वनाथ भोईर यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख
कल्याण
: कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे २४ तर भाजपचे सहा नगरसेवक होते. शिवसेनेचे ताकद जास्त होती. त्यामुळे गेल्यावेळी हा मतदारसंघ मागून घेतला आणि तो जिंकून देखील आणला. यंदा पक्षाच्या वाटणीला ही जागा येईल. महायुती म्हणून ही आम्ही प्रामाणिकपणे काम करणार. महायुती जो कोणी उमेदवार देईल; त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आदेश देतील त्या आदेशानुसार काम करणार; असं कल्याण पश्चिमचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. 

कल्याण (Kalyan) पश्चिम मतदार संघावर भाजपने धावा केला आहे. याबाबत बोलताना विश्वनाथ भोईर यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन आज करण्यात आले. या कार्य अहवाल तब्बल २ हजार कोटींच्या विकास कामाचा दावा करण्यात आला. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा कल्याण पश्चिम या मतदारसंघावर दावा केला; याबाबत बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सावध पवित्र घेतला. तर शिवसेना शिंदे गटाकडून देखील अनेक इच्छुक असल्याचे प्रश्नाला उत्तर देताना भोईर यांनी इच्छुक असणं गैर नाही. इच्छुक असणे म्हणजे त्या पक्षाचा चढता आलेख आहे. (Mahayuti) महायुती जो उमेदवार देईल एकनाथ शिंदेचे आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार असल्याचे सांगितले.

Kalyan News
Solapur News : बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापतीवर अँटीकरप्शनची कारवाई; पत्नी, मुलाच्या नावाने बेहिशोबी मालमत्ता

ठाकरे गटाकडून करण्यात झालेल्या आरोपांवर बोलताना विश्वनाथ भोईर यांनी त्यांच्या आरोप चुकीचे आहेत. माझा अहवाल त्यांच्यापर्यंत बाय पोस्ट किंवा बायहार्ड पोहोचवतो. ते पाहून त्यांनी ठरवावे काम झाले किंवा नाही. आम्ही जे काम केले ते काम घेऊन जनतेसमोर जाणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com