Solapur News : बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापतीवर अँटीकरप्शनची कारवाई; पत्नी, मुलाच्या नावाने बेहिशोबी मालमत्ता

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले यांच्याविरोधात अँटीकरप्शनने कारवाई केली आहे.
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर : बार्शी पंचायत समितीचे माजी सभापतींजवळ उत्पन्नापेक्षा जास्तीची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून माजी सभापती अनिल डिसले यांच्याविरोधात अँटीकरप्शनने कारवाई केली आहे. याशिवाय पत्नी व मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले यांच्याविरोधात अँटीकरप्शनने कारवाई केली आहे. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल डिसले यांनी तत्कालीन पंचायत समिती सभापती असताना भ्रष्ट आणि गैरमार्गाने उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप होता. त्यानुसार सोलापूर (Barshi) अँटी करप्शन पथकाने अनिल डिसले यांची चौकशी केल्यानंतरसदरची कारवाई करण्यात आली आहे. 

Solapur News
Sangola Vidhan Sabha : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्षांची सांगोल्यातून अपक्ष उमेदवारी; आमदार शहाजी बापू पाटील यांना धक्का VIDEO

पत्नी व मुलांच्या नावाने ९ कोटींच्यावर मालमत्ता 

अनिल डिसले यांच्यासह पत्नी आणि दोन मुलांविरोधात कमाईपेक्षा जास्त मालमत्ता आढळल्याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल डिसले यांच्यासह पत्नी आणि दोन मुलांच्या नावावर नऊ कोटी ६९ लाख रुपयांची अपसंपदा जमावल्याचे आढळून आली आहे. यामुळे अनिल डिसले यांच्यासह पत्नी संगीता डिसले, मुलगा स्वप्निल आणि सागर डिसले यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com