Yavatmal Politics 
महाराष्ट्र

Yavatmal Politics: संजय राठोडांना तगडी फाइट, २० वर्षांनंतर माणिकराव ठाकरे मैदानात; कोण मारणार बाजी?

Yavalmal Assembly Election 2024: दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीने संजय राठोड तर महाविकास आघाडीने माणिकराव ठाकरे हे तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरविले. या दोघांमध्ये अटीतटीचा सामना होत आहे. कशी असणार जातीय समीकरण, कोण मारणार बाजी? घ्या जाणून...

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात २० वर्षानंतर प्रथमच आजी-माजी मंत्र्यांमध्ये जोरदार लढत होत आहे. दिग्रस विधानसभेच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले असून इथे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री माणिकराव ठाकरे विरुद्ध विद्यमान पालकमंत्री महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय राठोड यांच्या थेट सामना रंगणार आहे.

दिग्रस विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरण -

१) बंजारा - ८५ हजार

२) ओबीसी - ६५ हजार

३) कुणबी - मराठा ६५ हजार

४) अदर समाज - ४५ हजार

५) मुस्लिम - ३५ हजार

६) एसी - ३० हजार

७) एसटी - २० हजार

एकुण मतदार - ३ लाख ४५ हजार

२००४ साली दारव्हा-नेर असा विधानसभा मतदारसंघ असताना काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरेंचा एकसंघ शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड यांनी पराभव करत प्रथम आमदार झाले. मात्र २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यात दाव्हार, नेरऐवजी दिग्रस, दारव्हा आणि नेर असे तीन तालुके मिळून विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. दिग्रस मतदारसंघ झाल्यानंतर विद्यमान मंत्री संजय राठोड सातत्याने विजयी होत आहेत. मात्र २० वर्षानंतर पहिल्यांदाच दिग्रस विधानसभा मतदारसंघात घमासान पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूंनी सुरू केलेल्या राजकीय डावपेचातून आजी-माजी मंत्र्यांमध्ये काट्याची लढत होत आहेत.

२००४ निवडणुकीतील आकडेवारी -

१) संजय राठोड, शिवसेना - ६८५८६

२) माणिकराव ठाकरे, काँग्रेस - ४७०४४

३) सुभाष ठोकळ, बीएसपी - १६७७५

२००४ निवडणुकीत दारव्हा-नेर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना ४७,०४४ मतदान मिळाले तर शिवसेनेचे संजय राठोड यांना ६८,५८६ मतदान घेत विजय मिळवला. याच निवडणुकीत बीएसपीचे सुभाष ठोकळ यांना १६,७७५ मतदान घेतल्याने माणिकराव ठाकरेंचा पराभव झाल्याचे बोलले जाते. मात्र तब्बल २० वर्षानंतर पुन्हा माणिकराव ठाकरे काँग्रेसकडून मैदानात उतरल्याने आजी-माजी मंत्र्यामध्ये काट्याची लढत होताना दिसत आहेत.

२००९ निवडणुकीत मिळालेली मते -

१) संजय राठोड, शिवसेना १०४१३४

२) संजय देशमुख,काॅग्रेस ४९९८९

३) ख्वाजा बेग २९३१९

संजय राठोड हे २०१४ साली राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांना यवतमाळचे अडीच वर्षे पालकमंत्री पद मिळाले. तर २०१९ साली ते कॅबिनेट मंत्री झाले आणि राठोड वनमंत्री झाले. मात्र वर्षभराचा काळ उलटत नाहीये तर ते एका प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अडीच वर्षाआधी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि मंत्री संजय राठोड यांनी एकनाथ शिंदेच्या मागे जाणं पसंद केलं. त्यानंतर पुन्हा ते कॅबिनेट मंत्री बनले. विशेष म्हणजे राठोड यांच्यावर यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जवाबदारी मिळाली. राठोड यांनी बंजारा समाजाची काशी पोहरागड इथे साडेसातशे कोटी रूपये विकास कामासाठी खेचून आणले. त्यामुळे त्यांच्यासाठी ही जमेची बाजू माणल्या जातेय.

२०१४ निवडणूकीत मिळालेली मते -

१) संजय राठोड,शिवसेना - १२१२१६

२) वसंत घुईखेडकर,एनसीपी - ४१३५२

३) देवानंद पवार,काँग्रेस - १८८०७

पूर्वीच्या दारव्हा मतदारसंघात माणिकराव ठाकरे यांनी चार तर तिथून एक आणि पुनर्रचनेनंतरच्या दिग्रसमध्ये तीन निवडणुका संजय राठोड यांनी जिंकल्या. सलग चार वेळा निवडून येण्याचा विक्रम दोघांच्याही नावावर आहे. आता मात्र सलग पाचव्यांदा निवडून येऊन संजय राठोड इतिहास रचणार की माणिकराव ठाकरे चार निवडणुकीनंतर विजयी परंपरा खंडित करणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार याकडे लक्ष लागले आहे.

२०१९ निवडणुकीत मिळालेली मते -

१) संजय राठोड, शिवसेना - १३६८२४

२) संजय देशमुख, अपक्ष - ७३२१७

३) तारीख लोखंडवाला, एनसीपी - ६२०५

चार टर्ममध्ये सातत्याने संजय राठोड याचं मताधिक्य वाढत गेले. त्यामुळे २०२४ निवडणुकीत संजय राठोड यांचे मताधिक्य वाढणार की, घटणार किंवा निवडणुकीत पराभूत होणार हे तर येत्या २३ नोव्हेंबर रोजीच कळणार...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tip: मनूका कोणत्या व्यक्तींनी खावू नये ?

VIDEO : हेमंत पाटील-प्रताप पाटील चिखलीकर मनोमिलनाचा महायुतीला फायदा?

Viral Video: मर्दानी! पोटासाठी दुचाकीवर बाळाला घेऊन डिलिव्हरीचे काम, तिचा व्हिडीओ पाहून कौतुक करालच

Maharashtra Politics : घाणेरडे इशारे, शिवीगाळ, माझ्यावर थुंकले - नवनीत राणांचा गंभीर आरोप, अडसूळ यांची फिरकी

Darker Mehndi: मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

SCROLL FOR NEXT