Yavatmal Police Bharti : पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना बीडमधून अटक; यवतमाळ पोलिसांची कारवाई

Beed news यवतमाळ येथे मागील वर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया झाली होती. त्यात बीडच्या शिरूर कासार तालुक्यात असणाऱ्या खांबा लिंबा गावातील अंबादास सोनवणे या उमेदवाराने बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत आढळून आले
Yavatmal Police Bharti
Yavatmal Police BhartiSaam tv
Published On

बीड : राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. पोलीस भरती पारदर्शक व्हावी; यासाठी पोलिसांकडून उमेदवाराची कुसुन तपासणी व कागदपत्र पडताळणी केली जाते. असे असतानाही काही उमेदवार बनावट कागदपत्र, प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरती होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. अशाच प्रकारे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Yavatmal Police Bharti
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील नाव द्या; खासदार रविंद्र वायकर यांची लोकसभेत मागणी

यवतमाळ (Yavatmal) येथे मागील वर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया झाली होती. त्यात बीडच्या शिरूर कासार तालुक्यात असणाऱ्या खांबा लिंबा गावातील अंबादास सोनवणे या उमेदवाराने बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत आढळून आले होते. (Police) पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये गुणवत्ता व आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अंबादास सोनवणे याची निवड झाली होती. मात्र अंबादास सोनवणेने बोगस अंशकालीन प्रमाणपत्र जोडल्याचे कागदपत्र पडताळणी आढळल्याने यवतमाळ पोलिसानी (Yavatmal Police) बीड तहसील कार्यालयात या प्रमाणपत्राची चौकशी केली. 

Yavatmal Police Bharti
Akola News : क्रूरतेचा कळस! पाय बांधत कुत्र्याला बेदम मारहाण, डोळेही फोडले; पोलिसांत गुन्हा दाखल

प्रमाणपत्र काढून देणारे दोघे ताब्यात 

त्यानुसार बीड तहसीदारांनी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर अंबादास सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल झाला. अंबादास सोनवणे याला अजय वानरे याने २० हजार रुपयात अंशकालीन बनावट प्रमाणपत्र दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर आजय वानरे याला बीडमधून ताब्यात घेतले असता वानरेच्या चौकशीत तहसीलचा अंशकालीन कर्मचारी श्रीराम शेजाळ यांच्यामार्फत प्रमाणपत्र काढल्याची माहिती समोर आली. त्यानंतर श्रीराम शेजाळ (रा. बीड) याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता यांच्याकडे तहसीलचे बनावट शिक्के आढळले आहेत. दरम्यान या दोघांनाही यवतमाळ येथील न्यायालसमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com