Vidhan Sabha Election MVA saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेसाठी मविआची वज्रमूठ; महाविकास आघाडी विधानसभेसाठी सज्ज

Vidhan Sabha Election MVA: लोकसभा निवडणूकीत तब्बल 30 जागा जिंकलेल्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यातच आता आगामी काळातील विधानसभा निवडणूकीतही आघाडी कायम राहणार असल्याचं महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलंय...त्यावरचा हा खास रिपोर्ट.

Bharat Jadhav

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

लोकसभेला महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांवर विजय मिळवत राज्यात महायुतीची धुळधाण केली. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने एकतेचा नारा देत विधानसभेसाठी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. लोकसभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेस विधानसभेला एकला चलोचा नारा देण्याची शक्यता वर्तवली जात होती.

त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेविषयी संशय आणखीच बळावला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी एकला चलोच्या चर्चा फेटाळून लावत काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं मविआच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात विधानसभेसाठीचा प्लॅन सांगितलाय.

भाजपविरोधात मविआचा मेगा प्लॅन

विधानसभेत मविआ एकत्र लढणार

घटकपक्ष आणि सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घेणार

महाराष्ट्रासह इतर राज्यांवर लक्ष केंद्रीत करणार

दरम्यान, लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी दंड थोपटलंय. तर दुसरीकडे लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या जागांवरही परिणाम होणार असल्याचं विश्लेषण समोर आलंय. विभागवार कसा परिणाम होऊ शकतो ते पाहूया,.

कोकण

महायुती 26

महाविकास आघाडी-10

मुंबई विभाग

महायुती-16

महाविकास आघाडी-19

उत्तर महाराष्ट्र

महायुती-27

महाविकास आघाडी-15

पश्चिम महाराष्ट्र

महायुती-24

महाविकास आघाडी-31

मराठवाडा

महायुती-12

महाविकास आघाडी-34

विदर्भ

महायुती-19

महाविकास आघाडी-41

महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकांनाही एकत्र सामोरी गेली होती. मात्र जागावाटपात झालेला घोळ, सांगलीच्या जागेवर झालेली बंडखोरी यासाऱखी आव्हानं मविआ समोर कायम असणार आहेत ? यावर मविआ कसा तोडगा काढणार हाच प्रश्नय. पत्रकार परिषदेत एकत्र असल्याचे दावे करणारी मविआ जागावाटपातही तितकीच एकजुट दाखवते का हे पाहावं लागले. यावरच मविआच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT