Rajan Salvi latest statement Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? राजन साळवी म्हणाले, पराभवच्या वेदना आहेत

Rajan Salvi latest statement: राजन साळवी हे नाराज असून ते लवकरच शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण यावर आता राजन साळवी यांनी प्रतिक्रिया देत आपले मत स्पष्टपणे सांगितले.

Priya More

कोकणाताली राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. नाराज असलेल्या राजन साळवी हे महिनाभरामध्ये ठाकरे गटाचे साथ सोडत शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. पण या सर्व चर्चांना आता राजन साळवी यांनीच पूर्णविराम दिले आहे. ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याच्या अफवा असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे.

राजन साळवी यांनी सांगितले की, 'पराभवच्या वेदना आहेत. मला तुमच्याकडून कळतंय मी नाराज आहे. या सर्व अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकल्या आंब्यावर कुणी तरी दगड मारणारच. मी मतदारसंघात कामं करत आहे. माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलेन.'

तसंच, एसीबीच्या चौकशीचा निर्णय न्यायालयातून येणार आहे. त्यात आमच्यावर एसीबीची टांगती तलवार आहे. पराभवला कोण कारणीभूत आहे याचा शोध घेतला पाहिजे. समोरच्याला कोणी मदत केली याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.', असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले. तसंच विनायक राऊत चांगले काम करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

निवडणुकीत आणि निवडणूकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात आहे. यासोबतच कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता आहे. त्यामुळे महिनाभरात राजन साळवी ठाकरे गट सोडण्याबाबत निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. राजन साळवी भाजपसोबत जाणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहेत.

राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडली तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. पण आता राजन साळवी यांनी कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना

'मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कामं मी आजपर्यंत केली आहेत. त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे.', असे सांगितले होते. आज परत त्यांनी पक्ष सोडण्याबाबत होत असलेल्या चर्चा या अफवा असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratalyachi Kheer Recipe: सुट्टीच्या दिवशी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याची खीर

Mumbai Crime : धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये ट्रान्सजेंडरने नको ते केले, तरुणीच्या अंगाला स्पर्श केला अन्....

Benefits of Good Sleep: कोणत्या वयोगटातील व्यक्तींना किती तासांच्या झोपेची गरज असते? न्यूरोलॉजिस्टने सांगितली परफेक्ट स्लीप गाईड

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

SCROLL FOR NEXT