Ratnagiri Sindhudurg Constituency: नारायण राणेंचे आव्हान? छे..., रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार जाहीर हाेत नाही यातच आमचा विजय : राजन साळवी

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र असू दे अथवा शिंदे गटाचे उमेदवार असू दे विजया आमचाच आहे असेही राजन साळवींनी यापूर्वी देखील नमूद केले हाेते.
rajan salvi says vinayak raut will defeat narayan rane in ratnagiri sindhudurg constituency lok sabha election 2024
rajan salvi says vinayak raut will defeat narayan rane in ratnagiri sindhudurg constituency lok sabha election 2024saam tv

Ratnagiri Sindhudurg Constituency :

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात विराेधकांना अद्याप उमेदवार जाहीर करता आलेला नाही. ही गाेष्ट दु्र्देवी असून समाेरचा उमेदवार काेणीही असाे आत्ताच आमचा महाविकास आघाडीचा विजय झाल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी (mla rajan salvi) यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

आमदार साळवी म्हणाले रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीची घोषणा होऊन सुद्धा समोरच्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.

rajan salvi says vinayak raut will defeat narayan rane in ratnagiri sindhudurg constituency lok sabha election 2024
Kolhapur Constituency : काॅंग्रेसनं अप्पी पाटलांना केलं आपलसं, चंदगडमधून महायुतीला बसणार दणका?

हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्लाच राहणार. खासदार विनायक राऊत (vinayak raut) हे विजयाची हॅट्रिक करणार. आमचा उमेदवार अडीच तीन लाखाच्या फरकाने निवडून येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही राजन साळवी यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे (narayan rane) आव्हान आम्हांला कोकणामध्ये (konkan politics) अजिबात वाटत नाही. या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच वर्चस्व आहे आणि राहणार असा विश्वास साळवींनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

rajan salvi says vinayak raut will defeat narayan rane in ratnagiri sindhudurg constituency lok sabha election 2024
'मविआ'ने शाहू महाराज छत्रपतींचा सन्मान राखला, भाजपकडून उदयनराजे वेटींगवर : सुषमा अंधारे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com