Kolhapur Constituency : काॅंग्रेसनं अप्पी पाटलांना केलं आपलसं, चंदगडमधून महायुतीला बसणार दणका?

vinayakrao patil : अप्पी पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका देखील केली. तसेच आपल्या भागातून शाहू महाराज छत्रपती यांना मताधिक्य देऊ असे आश्वासन दिले.
appi alias vinayakrao patil from chandgad enters in congress
appi alias vinayakrao patil from chandgad enters in congresssaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते विनायक उर्फ अप्पी पाटील (appi alias vinayakrao patil) यांनी आज (शुक्रवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अप्पी पाटील यांचा दिमाखात प्रवेश झाला. अप्पी पाटील यांच्या काॅंग्रेस प्रवेशामुळे महाविकास आघाडीची काेल्हापूर मतदारसंघात आणखी ताकद वाढल्याचे बाेलले जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विनायक उर्फ अप्पी पाटील यांची गडहिंग्लज, चंदगड परिसरात चांगली ताकद आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशास मालोजीराजे छत्रपती यांच्यासह काेल्हापूर येथील मान्यवर नेते, कार्यकर्ते उपस्थित हाेते. यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी अप्पी पाटील यांचे स्वागत केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

appi alias vinayakrao patil from chandgad enters in congress
"सुंदर मुली घ्या पाणीपुरी" Innovative उदयनराजेंची दाद, YC College मध्ये नेमकं काय घडलं?

चारच दिवसांपूर्वी अप्पी पाटील यांनी आपल्या गटाचा मेळावा घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (shahu maharaj chhatrapati kolhapur) यांना पाठिंबा दिला होता. आज शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणातून अप्पी पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका देखील केली. तसेच आपल्या भागातून शाहू महाराज छत्रपती यांना मताधिक्य देऊ असे आश्वासन दिले.

Edited By : Siddharth Latkar

appi alias vinayakrao patil from chandgad enters in congress
Kolhapur News : कोल्हापुरातील युवा पिढी गुन्हेगारीच्या वाटेवर, सत्यजित कदमांची गृहमंत्र्यांना लक्ष घालण्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com