"सुंदर मुली घ्या पाणीपुरी" Innovative उदयनराजेंची दाद, YC College मध्ये नेमकं काय घडलं?

आज उदयनराजेंनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजिलेल्या फन फेअरला भेट दिली. उदयनराजेंच्या एंट्रीने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले.
udayanraje bhosale interaction with college students satara constituency lok sabha election 2024
udayanraje bhosale interaction with college students satara constituency lok sabha election 2024saam tv
Published On

Satara :

काॅलेजचे जीवन खूप महत्वाचे असतं. या काळात मुलामुलींची आयुष्यातील पुढची जडणघडण हाेत असते. मजा मस्ती करतानाच शिक्षण, आराेग्य देखील खूप महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांंनी लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांनी साता-याचा नावलाैकिक वाढवावा असे आवाहन आज (शु्क्रवार) खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी सायन्स काॅलेजच्या विद्यार्थ्यांना केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) खासदार उदयनराजे भाेसले यांनी लाेकसभा निवडणुक लढविणारच अशी घाेषणा केली आहे. सध्या उदयनराजे हे सातारा जिल्ह्यातील लाेकसभा मतदारसंघात बैठका घेताहेत. ग्रामीणसह शहरी भागात दाैरा करीत आहेत.

आज उदयनराजेंनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजिलेल्या फन फेअरला भेट दिली. उदयनराजेंच्या एंट्रीने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले. यावेळी शेकडाे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलने कॉलर उडवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच कल्लाेळ केला.

एवढेच नाही तर महाविद्यालयातील किस्से देखील विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात फूड स्टॉल उभारले होते. या फूड स्टॉलमध्ये भेट देत असताना एका विद्यार्थ्याने त्याच्या फूड स्टॉल कडे आकर्षित करण्यासाठी "सुंदर मुली घ्या पाणीपुरी" या आशयाचा फलक लावला होता. या फलकाकडे पाहून खासदार उदयनराजेंनी हात जोडले. या फन फेअर मध्ये आलेले मुले मुलीनी खासदार उदयनराजे भोसले यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale interaction with college students satara constituency lok sabha election 2024
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी, काय आहे नेमकं कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com