Maharashtra Politics : 2025 मध्ये काका-पुतण्या एकत्र येणार? शरद पवार आणि अजित पवारांसाठी देवाला साकडं, VIDEO

Maharashtra Political News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात संघर्ष रंगला होता. मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..

भरत मोहोळकर, साम टीव्ही

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्याला कारण ठरलंय अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठूरायाला घातलेलं साकडं... पवार कुटुंबातील वाद मिटून पवार कुटुंब एकत्र यावं, असं साकडंच अजित पवारांच्या आईने विठुरायाला घातलंय.

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ यांनीही पवार कुटुंब एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केलाय...तर रामदास आठवलेंनीही पवारांना एनडीएत येण्यासाठी साद घातलीय...

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडल्याचं दिसून आलं..लोकसभा आणि विधानसभेतही पवार कुटुंबात संघर्ष दिसून आला. त्यानंतर पवार कुटुंबाचा पारंपरिक दिवाळी पाडवाही वेगवेगळा साजरा झाला...त्यामुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाल्याची चर्चा रंगलीय.. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील महिलांनी कुटुंब एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतलाय.

Maharashtra Politics
Sharad Ponkshe: नाटकादरम्यान शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले; ४० वर्षात असं पहिल्यांदाच घडलं, रंगभूमीवर नेमकं काय झालं?

पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत पवार कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेतल्याने त्याला राजकीय मोठा प्रतिसाद मिळतोय.. त्यामुळे पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी अजित पवारांच्या आईने विठ्ठलाला घातलेलं साकडं विठुराया ऐकणार का? आणि पवार कुटुंब एकत्र येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र पवार कुटुंब एकत्र आल्यास राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com