Beed Politics : बीडमध्ये आमदारांना अंगरक्षक नाही; 26 गुन्हे असलेल्या कराडला 2 अंगरक्षक, पाहा स्पेशल रिपोर्ट

Santosh Deshmukh Case : बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद आहे. तरीही त्याला दोन पोलिसांचं संरक्षण असल्याने भूवया उंचावल्या आहेत. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या कराडच्या अंगरक्षकांवरुन विरोधकांनी यंत्रणेला धारेवर धरलंय. पाहूया एक रिपोर्ट...
Walmik Karad
Walmik Karad NewsSaam Tv News
Published On

बीड : सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणानंतर अनेक गोष्टी उघड होत आहेत. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कृत्ये करत हैदोस घातलेल्या वाल्मिक कराडच्या दिमतीला आता दोन पोलिस असल्याचेही समोर आले आहे. कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद असूनही त्याला पोलिस संरक्षणात असल्याने भूवया उंचावल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील लोकनियुक्त आमदारांना सुद्धा अंगरक्षक नाहीत. पण वाल्मिक कराडला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपांवरून कराड हा पोलिस संरक्षणात उजळ माथ्याने फिरत असल्याचे दिसून येते. कराड विरोधातल्या गुन्ह्यांचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.

Walmik Karad
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा ठावठिकाणा लावण्यात CID ला यश, शेवटचं लोकेशन ट्रॅक
Walmik Karad
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या तपासाचा वेग वाढला; आरोपी आणि नातेवाईकांचे बँक खाते गोठवलं

26 गुन्हे दाखल असलेल्या वाल्मिक कराडला दोन अंगरक्षक आहेत. बीडमधील विद्यमान आमदारांपैकी सुरेश धस, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा यांना अंगरक्षक नाहीत. अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम खाडे, बजरंग सोनवणे, मृत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख, संदीप क्षीरसागर यांना प्रत्येकी एकेक पोलिस अंगरक्षक तर धनंजय मुंडे, सुभाष राऊत यांना प्रत्येकी दोन अंगरक्षक आहेत. शिवाय, अनेकांकडे दहा-दहा वर्षे तेच पोलिस अंगरक्षक असल्याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.

Walmik Karad
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या भावाची सीआयडीकडून चौकशी? मोठी अपडेट आली समोर | Video

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात अजून प्रमुख आरोपी फरार असल्याने त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांना हे आदेश दिले आहेत. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि निर्घृण हत्या, पवनचक्की प्रकल्पामध्ये दोन कोटींची खंडणीची मागणी, अॅट्राॅसिटी तसेच पवनचक्की प्रकरणी मारहाण अशा चार प्रकरणातील नऊ आरोपींच्या मुसक्या आवळत खाती गोठवण्यात आली आहेत. कराडच्या एका निकटवर्तीयाला सुद्धा पोलिसांनी उचलले आहे. पोलिसांनी कराड भोवतीचा फास आवळला आहे. पुढे काय घडतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com